गोंदिया : सर्वच विभागात बदलीचे सत्र सुरू आहे. पोलीस विभागातही हीच स्थिती आहे. सहायक पोलीस निरीक्षकपदावरून पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झालेल्या सात पोलीस निरीक्षक तर अन्य एक अश्या आठ पोलीस निरीक्षकांची बदली गोंदिया जिल्ह्यासाठी झाली आहे. मुंबई येथील विशेष सुरक्षा विभागाचे भरत अप्पाजी पाटील, ठाणे शहर येथील मोहन कृष्णा खंदारे, अमरावती ग्रामीण येथील दिनेशचंद्र रघुवरद्याल शुक्ला, नवी मुंबई येथील राजेश रामचंद्र तटकरे, पुणे शहर येथील प्रशांत बंडू भस्मे, मुंबईच्या महासुरक्षा पथकातील मंगेश सदानंद चव्हाण तर भंडारा येथील अशोककुमार रामप्रताप तिवारी यांची पदोन्नतीवर गोंदिया येथे बदली करण्यात आली. गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक उईके यांची बदली गोंदियात करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील चारही उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आले नाही. चार उपविभागीय अधिकाऱ्यांची बदली झाली मात्र नाशिक येथील रामदास राठोड हे एकटेच मंगळवारी गोंदिया येथे रुजू झाले. त्यांना अजून निश्चित ठिकाण मिळायचे आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात येणार आठ पोलीस निरीक्षक
By admin | Updated: June 24, 2015 01:53 IST