शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

साखरीटोला येथे आठ जोडपी बांधल्या गेली परिणय सूत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 01:45 IST

सामूहिक विवाहाचे अनेक फायदे असून गरीब, सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरत आहे.

समितीचे १३वे वर्ष : कुणबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळासाखरीटोला : सामूहिक विवाहाचे अनेक फायदे असून गरीब, सर्वसामान्य लोकांसाठी वरदान ठरत आहे. जे पालक आपल्या मुला-मुलींचा विवाह सामूहिक विवाह सोहळ्यात लावून देतात त्यांचा खऱ्या अर्थाने जाहीर सत्कार करावा. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळेल व अधिक संख्येने लोक सामूहिक विवाह सोहळ्याकडे आकर्षित होतील, असे प्रतिपादन आ. संजय पुराम यांनी केले.साखरीटोला येथे पार पडलेल्या कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. रविवारी २४ एप्रिलला सकाळी ११.०५ वाजता जि.प. केंद्र प्राथमिक शाळेच्या पटांगणावर कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात आठ जोडपी विवाहबध्द झाली. या वेळी अतिथी म्हणून आ. संजय पुराम, आ. राजेंद्र जैन, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, माजी वनमंत्री भरत बहेकार, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, माजी आ. रामरतन राऊत, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प. सदस्य लता दोनोडे, जि.प. सदस्य दुर्गा तिराले, सभापती हिरालाल फाफनवाडे, सरपंच संगीता कुसराम, सहेषराम कोरोटे, संपत सोनी, सरपंच रेखा फुंडे, माजी जि.प. सदस्य कमल बहेकार, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, सुनील अग्रवाल, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, उपसरपंच भूमेश्वर मेंढे, समितीचे उपाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, रमेश चुटे, युगराज कोरे, देवराम चुटे, डॉ. संजय देशमुख, संजय देशमुख, संजय दोनोडे, टी.जी. फुंडे, राजू काळे, डॉ. अजय उमाटे, संतोष अग्रवाल, श्यामलाल दोनोडे उपस्थित होते. गायत्री मंत्राने विवाहाची सुरूवात करण्यात आली. मंगलाष्टकांनी विवाह पार पडला. मागील १३ वर्षापासून युवा कुणबी समाज सेवा समितीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा साजरा केला जातो. लग्न झाल्यानंतर समितीतर्फे विवाहाचे प्रमाणपत्र तसेच शुभमंगल योजनेचा लाभ मिळवून दिला जातो. विवाहीत जोडप्यांना विविध ट्रस्टच्या वतीने भेटवस्तू दिल्या जातात. यात मनोहर पटेल अ‍ॅकेडमी, प्रताप मेमोरीयल ट्रस्ट, आ. संजय पुराम यांच्याकडून विशेष भेट वस्तू, आ. राजेंद्र जैन तसेच नरेश माहेश्वरी यांच्याकडून विशेष भेटवस्तू, संपत सोनी, साखरीपाट बाबा देवस्थानतर्फे तसेच सरपंच संगीता कुसराम यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या. संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. आभार डॉ. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. रमेश बोहरे, प्रकाश दोनोडे, रामदास हत्तीमारे, नामदेव दोनोडे, संजय बागडे, निलकंठ दोनोडे, मनोज चुटे, अरविंद फुंडे, संतोष बोहरे, देवेंद्र मुनेश्वर, मंजू दोनोडे, प्रमिला दोनोडे, इंदू कोरे, सुषमा देशमुख, मिनू शिवणकर तसेच समितीच्या सर्व पदाधिकाारी व सदस्यांनी सहकार्य केले. तसेच श्री विद्या गर्ल्स हायस्कूल, बॅरि. राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालय, जि.प.केंद्र शाळा, जि.प.हायस्कूल यांचे विशेष सहकार्य लाभले. (वार्ताहर)