शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणातून उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 21:38 IST

ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे,

ठळक मुद्देराजकुमार बडोले : कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

आॅनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे, यासाठी आम्ही किमान १०० उद्योजक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्याचा डिक्कीसोबत करार केला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकास प्रशिक्षणातून उद्योजक उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), डी-गेन ग्रुप व एबी अँड सी स्किल अँड एज्युकेशन यांच्या माध्यमातून अनुसूचित प्रवर्गातील युवक व युवतींसाठी लॉजिस्टिक सेक्टर व जीएसटी अकांउंट क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष रचना गहाणे होत्या. यावेळी पं.स.सभापती अरविंद शिवणकर, भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, खरेदी विक्र ी केंद्राचे अध्यक्ष नामदेव कापगते, ठाणेदार प्रशांत भस्मे, शिवनारायण पालीवाल, भाजप जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, माजी सभापती प्रकाश गहाणे, न.प.उपाध्यक्ष विजय कापगते, रघुनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, मुरलीधर ठाकरे, डि-गेनचे संचालक तुषार राठी, विनोद ठोंबरे, एबी अँड सीचे अक्षय बाहेती, नागपूर बार्टीच्या सहायक प्रकल्प संचालक नेहा ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.पुढे बोलतांना पालकमंत्री बडोले यांनी, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९०० मुलींना प्रशिक्षित करून रोजगारभिमुख करण्यात आले आहे. बार्टीच्या माध्यमातून राज्यातील २० मुलींना एअरहोस्टेजमध्ये काम मिळाले आहे. आता आपले सर्व लक्ष ग्रामीण भगातील मुलांमुलींकडे असून त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे करणे आहे. राज्यात साडेबारा हजार बँक आहेत. एका बँकमधून मुद्रा योजनाच्या माध्यमातून २ उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळायला पाहिजे. म्हणजे २५ हजार उद्योजक उभे व्हायला पाहिजे. मात्र, बँकेच्या उदासिन धोरणामुळे राज्यात आतापर्यंत अनुसूचित जातीचे ५००, अनुसूचित जमातीचे १०० तर २७७४ महिला उद्योजक असे एकूण आतापर्यंत ३३७४ उद्योजक तयार झाले असल्याचे त्यांनी सांगीतले.राज्यातील बेरोजगारीचे निर्मुलन झाले पाहिजे, असे सांगत नामदार बडोले यांनी, शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बार्टीच्या माध्यमातून २० टक्के ओबीसी युवक-युवतींनाही या प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देवून पुढील महिन्यात ४ ते ५ कोटींचे साहित्य दिव्यांगाना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्तावीक झिल इन्फोटेकचे संचालक माणिक मेश्राम यांनी मांडले. संचालन प्रा. दिलीप काकडे यांनी केले. आभार तृप्ती मेश्राम यांनी मानले.