शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग म्हणतो तयार है हम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ...

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जि.प.शिक्षण विभाग शाळा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून ४ ऑक्टोबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरु केल्या जाणार आहे. त्यामुळे आता ४ ऑक्टोबरपासून तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हीच बाब लक्षात घेत आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.२४) शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात हजेरी लावणार आहेत. जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या एकूण १६६९ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण १ लाख ३३ हजार १५६ विद्यार्थी आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांचे सॅनिटायजेशन आणि रंगरगोटीचे कामसुध्दा पूर्ण झाले आहे. या सर्व शाळांमध्ये एकूण ३७६४६ शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून यापैकी जवळपास सर्व शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास कुठलीच अडचण नसल्याने शिक्षण विभागाने सांगितले.

..............

सूचनांकडे लक्ष

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. मात्र शाळा सुरु करताना कुठल्या गोष्टी करायच्या, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन यांची मंजुरी आणि पालकांचे सहमती पत्र लागणार का? एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे यासंदर्भात शासनाच्या काय सूचना येतात यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

...............

पालकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. तर मागील दोन महिन्यापासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकसुध्दा कंटाळले आहे. त्यामुळे शासनाने शुक्रवारी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसल्याने काही पालकांनी काळजीसुध्दा व्यक्त केली.

..............

जिल्ह्यातील एकूण शाळा : १६६९

जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी संख्या : १,३३१५६

.......................

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची विद्यार्थी संख्या

इयत्ता पहिली : १४५६५

इयत्ता दुसरी : १८५४२

इयत्ता तिसरी : २०४७६

इयत्ता चौथी : २०४०६

इयत्ता पाचवी : १९६६४

इयत्ता सहावी : १९४४०

इयत्ता सातवी : २००६३

..............................

कोट

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी जि.प.शिक्षण विभाग सज्ज आहे. शाळा सुरू करण्यासाठी कुठलीच अडचण नाही.

- अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी.