शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभाग म्हणतो, तयार है हम!­

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 05:00 IST

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून ४ ऑक्टोबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरु केल्या जाणार आहे. त्यामुळे आता ४ ऑक्टोबरपासून तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन महिन्यापूर्वी शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर आता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जि.प.शिक्षण विभाग शाळा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियमांचे पालन करून ४ ऑक्टोबरपासून पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्षात सुरु केल्या जाणार आहे. त्यामुळे आता ४ ऑक्टोबरपासून तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजणार हे निश्चित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र यामुळे बरेच विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात असल्याचे चित्र आहे.  ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हीच बाब लक्षात घेत आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.२४) शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनंतर पहिली ते सातवीचे विद्यार्थी शाळेत प्रत्यक्षात हजेरी लावणार आहेत. जिल्ह्यात पहिली ते सातवीच्या एकूण १६६९ शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण १ लाख ३३ हजार १५६ विद्यार्थी आहेत. या शाळा सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांचे सॅनिटायजेशन आणि रंगरगोटीचे कामसुध्दा पूर्ण झाले आहे. या सर्व शाळांमध्ये एकूण ३७६४६ शिक्षक व कर्मचारी कार्यरत असून यापैकी जवळपास सर्व शिक्षकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास कुठलीच अडचण नसल्याने शिक्षण विभागाने सांगितले. 

पालकांच्या संमिश्र प्रतिक्रियाnजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आहे. तर मागील दोन महिन्यापासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरू आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकसुध्दा कंटाळले आहे. त्यामुळे शासनाने शुक्रवारी शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसल्याने काही पालकांनी काळजीसुध्दा व्यक्त केली. 

सूचनांकडे लक्ष 

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. मात्र शाळा सुरु करताना कुठल्या गोष्टी करायच्या, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन यांची मंजुरी आणि पालकांचे सहमती पत्र लागणार का? एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे यासंदर्भात शासनाच्या काय सूचना येतात यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. 

राज्य सरकारने ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी जि.प.शिक्षण विभाग सज्ज आहे. शाळा सुरू करण्यासाठी कुठलीच अडचण नाही.- अनिल चव्हाण, उपशिक्षणाधिकारी.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या