शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणपूरक होळी साजरी करा-धुर्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 00:24 IST

पर्यावरण व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास अग्रेसर सातपुडा फाऊंडेशन संस्थेद्वारा नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या ...

गोंदिया : पर्यावरण व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन करण्यास अग्रेसर सातपुडा फाऊंडेशन संस्थेद्वारा नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक होळी सण साजरा कसा करावा, यासाठी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. नैसर्गिक घटक जसे पळसाची फुले व इतर वेगवेगळ्या रंगांचे फुले, पाने यापासून नैसर्गिक रंग कसे तयार करतात त्यांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. पिवळा रंग पळसाच्या फुलांपासून, हिरवा रंग, पालक भाजीपासून, गुलाबी रंग, बिटपासून लाल रंग, लाल रंगाच्या फुलापासून तसेच गुलाल खेळायचा असेल तर याच रंगापासून बेसणात किंवा पिठात मिसळून त्यांना उन्हात वाळविल्यास गुलाल बनविता येतो. बाजारात वेगवेगळ्या रंगाचे रंग व गुलाल उपलब्ध आहेत. आता तर फ्लोरोसेन्ट रंग व गुलाल सुद्धा उपलब्ध आहेत व या सर्व रंगात घातक असे रसायन मिसळलेले असल्याने त्याचा वाईट परिणाम होतो, हे मुकुंद धुर्वे यांनी सांगितले. एक गाव एक होळी याबाबतही मुलांना समजावून सांगितले. समजा एका होळीत १०० किलो लाकूड जाळले तर जिल्हाभर किती मोठ्या प्रमाणात लाकुड जाळल्या जातात याबद्दलचे मार्गदर्शन केले. जी.ई.एस. हायस्कुल कुऱ्हाडी, आदिलोक हायस्कुल बोळुंदा, जि.प. प्राथमिक शाळा बोळुंदा, बागडबन, मंगेझरी, मुंडीपार, भजेपार, बेरडीपार, वडेगाव, भिमराव हायस्कुल वडेगाव, हरिकृष्ण हायस्कुल कोडेलोहारा, आश्रम शाळा कोयलारी व मेंढा या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांना फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी मुकुंद धुर्वे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व फाऊंडेशनचे जीवराज सलाम, सलीमकुमार धुर्वे यांनी मदत केली. (जिल्हा प्रतिनिधी)