शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गूळ-शेंगदाणे खा आणि हिमोग्लोबिन झटपट वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 05:00 IST

कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, गरोदरपणात पोषक आहार न घेणे आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशात महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, शरीरावर पांढरेपणा आदी लक्षणे दिसून येतात.

कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  आज महिला पुरुषांच्या बरोबर आली असून सर्वच क्षेत्र गाजवत असून, कशा प्रकारेही कमी नाही. असे असतानाही महिला कुटुंबाचा सांभाळ करताना स्वत:ला हरवून बसते, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, गरोदरपणात पोषक आहार न घेणे आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशात महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, शरीरावर पांढरेपणा आदी लक्षणे दिसून येतात. अवघ्या कुटुंबाचा सांभाळ महिलांच्या खांद्यावर असल्याने महिलांनी वेळीच सावध होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. 

 हिमोग्लोबिनचे प्रमाण किती हवे? n शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्राम परसेंटमध्ये मोजले जात असून ते कमी झाल्यास शरीरावर त्याचे काही परिणाम लगेच जाणवतात. nभारतातील महिलांमध्ये किमान ११ ग्राम परसेंट हिमोग्लोबिन असणे गरजेचे असून ते कमी झाल्यास महिलांना त्रास जाणवतो. 

कारणे काय? खानपानाकडे लक्ष न देणे, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे, सिकलसेल व थॅलिसिमिया यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. असे असल्यास महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, भोवळ येणे तसेच शरीर पांढरे दिसणे आदी लक्षणे दिसून येतात. 

पालेभाज्या खा, हिमोग्लोबिन वाढवा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरवून देण्यात आले असून महिलांमध्ये किमान ११ ग्राम परसेंट असणे गरजेचे आहे. यासाठी पालेभाज्या, फळांमध्ये सफरचंद, अंगूर, पेंडखजूर, अंजिर, बीट आदींचे नियमित सेवन करावे. तसेच गूळ-शेंगदाण्याचे सेवन केल्यानेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविता येते. 

वेळीच लक्ष द्यामासिक पाळीत अतिरक्तस्त्राव, खानपानाकडे दुर्लक्ष व गरोदरपणात पोषक आहार न घेणे यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. याचे परिणाम होणाऱ्या बाळावरही होतात. याकरिता महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. निर्मला जयपुरिया, स्त्रीरोगतज्ज्ञ 

इच्छा असूनही रक्तदान करता येईना

महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता हे कारण त्यांना इच्छा असूनही रक्तदानापासून लांब ठेवते. कारण महिलांमध्ये किमान १२.५ ग्राम परसेंट हिमोग्लोबीन असणे गरजेचे आहे. याशिवाय रक्तदानासाठी इच्छुक महिलेला थायरॉईड, बीपी, शुगर, मासिक पाळी आहे काय, हे सर्व विचारून तसेच वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच रक्त घेतले जाते. - नितीन रायकवार, तंत्रज्ञ, लोकमान्य रक्तकेंद्र

बहुतांश महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते व यामुळे त्यांना रक्तदान करता येत नाही. महिलांमध्ये किमान १२.५ ग्राम परसेंट हिमोग्लोबिन व किमान वजन ५० किलो असणे गरजेचे आहे. याशिवाय आवश्यक त्या अन्य चाचण्या केल्या जातात व त्यानंतरच रक्त घेतले जाते. यामुळेच महिलांचे रक्त कमी प्रमाणात घेतले जाते.  - डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, केटीएस रुग्णालय

 

टॅग्स :Healthआरोग्य