शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदाराच्या दडपशाही धाेरणामुळे महिला पोलीस शिपायाने प्राशन केले फिनाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

ठाणेदाराच्या हिटलरशाही धोरणामुळे पोलीस कर्मचारी तणावात काम करीत आहेत. यातूनच नीतू चौधरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल, नि:ष्पक्ष चौकशी दुसऱ्या यंत्रणेकडून करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस शिपाई नीतू चौधरी यांनी फिनाईल प्राशन करून २ जूनरोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. ठाणेदाराच्या हिटलरशाही धोरणामुळे पोलीस कर्मचारी तणावात काम करीत आहेत. यातूनच नीतू चौधरी यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. या प्रकरणाची सखोल, नि:ष्पक्ष चौकशी दुसऱ्या यंत्रणेकडून करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. गोंदिया शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी २ जूनरोजी आपल्या अधिनस्त कर्मचारी महिला पोलीस शिपाई नीतू चौधरी यांचा खूप अपमान केल्यामुळे त्यांनी फिनाईल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी दुसऱ्या संस्थेकडून करून कार्यरत असलेले महेश बनसोडे यांना तत्काळ येथून हटवावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी महेश बनसोडे यांना हटवण्याची ग्वाही दिली. शिष्टमंडळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अमर वऱ्हाडे, आ. सहेषराम कोरोटे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी. जि. प.अध्यक्ष उषा मेंढे, माजी सभापती पी. जी. कटरे, इसुलाल भालेकर व इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

ठाणेदार बनसोडेची नियंत्रण कक्षात रवानगी

- पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना ठाणेदारांकडून वारंवार त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्यामुळे एका महिला पोलीस कर्मचारी ने फिनाईल प्राशन करून दोन जून रोजी सकाळी ११ वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला हे प्रकरण चांगलेच गाजत असताना पोलीस अधीक्षक विश्वास पानसरे यांनी गोंदिया शहरचे ठाणेदार महेश बनसोडे यांची तडकाफडकी रवानगी पोलीस नियंत्रण कक्ष येथे केली आहे. तर त्यांच्या ठिकाणी ठाणेदार म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.प्रकरण दडपण्याचा प्रयत्न - २ जून रोजी गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस शिपाई यांचा आत्महत्येचा प्रयत्न पोलीस विभागाने दडपण्याचा प्रयत्न केला. त्या पोलीस शिपायाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केल्यावर दिवसभर कोणत्याही राजकीय प्रतिनिधी, प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेटण्यास मज्जाव केला. नीतू चौधरी यांच्या नातेवाईकांनासुद्धा रुग्णालयाच्या परिसरामध्ये राहू दिले नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण दपडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला.

 

टॅग्स :Policeपोलिस