शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 21:09 IST

मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला आहे.

ठळक मुद्देवातावरणात उकाडा वाढला : अपेक्षित पावसाची तूट वाढतच चालली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्यंतरी संततधार बरसलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून अचानक दडी मारली आहे. परिणामी वातावरणात बदल दिसून येत असून उकाडा वाढला आहे. विशेष म्हणजे, पावसाने दडी मारल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १३८ मीमी पावसाची तूट दिसून येत असून हा फरक वाढतच चालला आहे.यंदा जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने चांगला जोर दाखविला. दमदार पावसामुळे जिल्हा पाणीदार झाला व वातावरण ही गार झाले होते. दररोज हजेरी लावत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील पर्जन्याला अपेक्षित सरासरी गाठली जाणार असल्याचे दिसत होते. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाऊस बरसत नसून त्यात उन्ह तापत असल्याने वातावरण बदलले व उकाडा वाढला आहे. परिणामी सुरूवातीपासूनच अपेक्षित पावसाची आकडेवारी गाठता आलेली नाही.पावसाने दडी मारल्याने प्रामुख्याने शेतकरी चिंतेत अडकला आहे. पाऊस बरसत असल्याने जोमाने शेतीच्या कामाला लागलेला शेतकरी आता पुन्हा आकाशाकडे बघत बसला आहे.जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता १२ जुलैपर्यंत ३८२.७२ मीमी सरासरी पाऊस बरसने अपेक्षित असतानाच आतापर्यंत २४४.७९ मीमी सरासरी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. म्हणजेच, आजही १३८ मीमी सरासरी पावसाची तूट कायम आहे. त्यात आता दिवस वाढत चालल्याने ही तूट अधिकच वाढत चालली आहे.रोवणी अडकणारसंततधार बरसत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोमाने कामाला लागला होता. त्यात कित्येकांनी रोवणी आटोपली किंवा सुरू केली आहे. तर कित्येकांची रोवणी अद्यापही झालेली नाही. त्यात आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने रोवणी अडकणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदर पावसाच्या खेळीमुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेच्या सावटात अडकला आहे. दमदार व संततधार पावसासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असतानाच सर्वांच्या व स्वत:च्या पोटासाठी घाम गाळणारा शेतकरी मात्र डोळ््यात पाणी आणून पाण्याची वाट बघत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती