शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे ईदच्या उत्साहावर विरजन

By admin | Updated: July 19, 2015 01:33 IST

ऐन रमजान ईदच्या दिवशी सकाळपासूनच बरसलेल्या दमदार पावसामुळे मुस्लीम बांधवांच्या उत्साहावर विरजन पडले.

ईदगाहतील नमाज रद्द : शेतकरी मात्र सुखावला गोंदिया : ऐन रमजान ईदच्या दिवशी सकाळपासूनच बरसलेल्या दमदार पावसामुळे मुस्लीम बांधवांच्या उत्साहावर विरजन पडले. पावसामुळे ईदगाह येथे होणारी नमाज रद्द करण्यात आली. मात्र या पावसामुळे उकाड्यापासून सुटका मिळाली असतानाच आकाशाकडे नजरा लावून बसलेला शेतकरी मात्र सुखावला. पाऊस बरसल्यामुळे शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला लागला. मुस्लीम धर्मीयांचा सर्वात पवीत्र व महत्वाच सण म्हणून रमजान ईद गनली जाते. मागील महिन्याभरापासून मुस्लीम बांधव रोजे ठेवतात व रमजान ईद साजरी करून आपला आनंद व्यक्त करतात. साक्षात अल्लाहचा महिनाच म्हणून रमजान चा म्हटला जातो. त्यामुळे रमजान ईदसाठी मुस्लीम बांधवांकडून जोमात तयारी सुरू होती. शुक्रवारी (दि.१७) शहरातील बाजारपेठेत मुस्लीम बांधवांची खरेदीसाठी एकच गर्दी दिसून येत होती. तर शेवयांच्या दुकानांतही मुस्लीम बांधव शेवई खरेदी करताना दिसून येत होते. शनिवारी (दि.१८) रमजान ईदची नमाज येथील ईदगाहवर होणार होती. मात्र सकाळपासूनच पाऊस बरसल्यामुळे ईदगाहवर होणारी नमाज रद्द करण्यात आली. त्यामुळे मस्जीद मध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. मात्र पाऊस असल्याने त्यांच्या उत्साहावर पडल्याचे दिसून आले. पावसामुळे सर्वांनीच आपापल्या घरात राहूनच ईदचा सण साजरा करण्यावर भर दिला. (शहर प्रतिनिधी)बळीराजा उतरला शेतात पावसाने दडी मारल्यामुळे शेतीची कामे खोळंबून पडली होती. जिल्ह्यात कित्येक भागांत अद्यापही रोवण्या झालेल्या नाहीत. पाऊस नसल्यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. कधी-कधी पाऊस बरसतो व शेतीच्या कामाला लागतो असा तयारीत बळीराजा दिवस मोजत होता. त्यात शनिवारी सकाळपासून हजेरी लावलेल्या पावसाने बळीराजा सुखावला व त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पाऊस बरसल्याने बळीराजा पुन्हा शेतात उतरला असून शेतीच्या कामांत व्यस्त झाला.