शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 22:41 IST

वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देशेतीची कामे प्रभावित : दुरूस्तीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : वीज वितरण विभागाकडून विद्युत देखभाल दुरुस्तीच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने ग्राहकांसह शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज वाहून नेणाऱ्या खांबाच्या तारांची देखरेख करीत नसल्यामुळे दररोज विद्युत पुरवठा खंडीत होत आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तारांना स्पर्श होणाऱ्या झाडांच्या फांद्याची कटाई करण्याचे काम विद्युत विभागाकडून केले जाते. यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करुन दिला जातो. मात्र कामाची जबाबदारी असलेले कर्मचारी आपली जबाबदारी झटकत असल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येत मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. वीज पुरवठा सुरळीत व्हावा, या दृष्टीकोणातून विद्युत वाहिन्या तारांची व खांबाची देखरेख करण्याकडे सुध्दा या विभागाचे दुर्लक्ष झाल्याची ओरड ग्राहकांकडून होत आहे. यासंदर्भात माहिती घेतली असता विद्युत वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने या समस्येत वाढ होत असल्याची बाब पुढे आली आहे. यंदा पावसाळ्याला सुरूवात होवून सुध्दा विद्युत वितरण विभागाने तारांना स्पर्श होणाºया रस्त्यावरील झाडांच्या फांद्याची कटाई केली नाही. परिणामी जोराचा वारा आल्यास वृक्षांच्या फांद्याचा विद्युत तारांना स्पर्श होवून वांरवार विद्युत पुरवठा खंडीत होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळेस साप, विंचू व कीडे निघण्याची भीती असते. त्यातच वीेज पुरवठा खंडीत राहत असल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे विद्युत वितरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घेवून वेळीच उपाय योजना करण्याची मागणी तालुक्यातील वीज ग्राहकांनी केली आहे.शेतीची कामे प्रभाविततालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाच्या सोयीसाठी मोटारपंप लावले आहे. विहीर किंवा बोअरवेलमधून मोटारपंप पाण्याचा उपसा करण्यासाठी विजेची गरज असते. मात्र नेमका याच कालावधीत विद्युत पुरवठा खंडीत राहत असल्याने शेतकºयांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.