शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांच्या लिलावाअभावी रेती तस्करांना मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 05:00 IST

रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टाकले असून जिल्हा खनिकर्म विभागाने या घाटांचा लिलाव केल्यास हे पोखरलेले रेती घाट घेण्यास तयार कोण होणार हा देखील मोठा प्रश्न आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  मागील वर्षी कोरोना आणि त्यानंतर पर्यावरण समितीची मंजुरी न मिळाल्याने जिल्ह्यातील २७ प्रमुख रेती घाटांपैकी १६ घाटांचे लिलाव होऊ शकले नाही. त्यामुळे मागील वर्षभरापासून रेती तस्करांना जिल्ह्यात मोकळे रान आहे. रेती तस्करांची मोठी लॉबीच जिल्ह्यात सक्रिय असून त्यांना राजकीय पाठबळ आणि या विभागाचे अप्रत्यक्षपणे सहकार्य मिळत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे चित्र आहे. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टाकले असून जिल्हा खनिकर्म विभागाने या घाटांचा लिलाव केल्यास हे पोखरलेले रेती घाट घेण्यास तयार कोण होणार हा देखील मोठा प्रश्न आहे. रेतीच्या तस्करीमुळे रेती घाटालगतच्या गावांमधील रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याची तक्रारसुध्दा अनेक ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन जिल्हाधिकारी आणि खनिकर्म विभागाकडे केली आहे. रेतीच्या उघडपणे होत असलेल्या तस्करी संदर्भात अनेकदा तक्रारी करून सुध्दा खनिकर्म विभागाकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने रेती तस्करांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे. रेती तस्करांना अप्रत्यक्षपणे राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा २५ कोटी रुपयांहून अधिक महसूल बुडाल्याची माहिती आहे. याला याच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. ओरड वाढल्यावरच कारवाई

- तिरोडा, गोंदिया, सडक अर्जुनी, आमगाव तालुक्यातील रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू आहे. ही बाब खनिकर्म विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनासुध्दा माहिती आहे; पण यानंतरही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. १४ वाहने पकडल्यानंतर प्रत्यक्षात पंचनामा करताना केवळ १० वाहनेच दाखविली जात असल्याचा प्रकार सुध्दा नुकताच घडला आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी दखल - रेती तस्करी संदर्भात अनेकदा खनिकर्म विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या; पण या विभागाचा कारभार मागे पाठ आणि पुढे सपाट असाच आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :sandवाळू