शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चारा पिकांच्या लागवडीतून करणार चारा टंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 23:01 IST

जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात.

ठळक मुद्देदोन हजारांवर शेतकऱ्यांनी केली लागवड : पशुसंवर्धन विभागाचा उपक्रम

आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्ह्याची ओळख धान उत्पादक जिल्हा म्हणून आहे. शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच प्रमाणात शेतकरी पशुपालन करतात. जिल्ह्यात ३ लाखांवर पशुधन असून त्यांच्यासाठी लागणाऱ्या चाऱ्याची समस्या निर्माण होवू नये, यासाठी जि.प. पशुसंवर्धन विभागाने शेतकºयांना चारा पिकाच्या लागवडीकरिता मोफत बियाणे उपलब्ध करुन दिले. दोन हजारावर शेतकऱ्यांनी चारा लागवड केल्याने चार टंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे.यंदा कमी पावसामुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने तणस देखील कामी येणार नाही.परिणामी निर्माण होणारी चारा टंचाईची समस्या लक्षात घेवून जि.प.पशुसंवर्धन विभागाने त्याचे पूर्व नियोजन केले आहे.चाºयाअभावी दुग्ध उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. पशुसंवर्धन विभागाच्या वैरण विकास कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना चारा लागवडीचा सल्ला देण्यात आला. पाण्याअभावी यंदा जिल्ह्यात रब्बी पिक घेता येणे शक्य नसल्यामुळे शेतकºयांनी कमी पाण्याच्या चारा पिकाचे उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चारा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक पंचायत समितीला बियाणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला.पंचायत समितीने ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात वळते केले. प्रत्येक शेतकऱ्याला चारा बियाणे खरेदीसाठी ६६६ रूपये देण्यात आले. जनावरांची चाऱ्याची समस्या मार्गी लावण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे २० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली होती.यापैकी १४ लाख रुपयांचा निधी शासनाने दिला असून तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळता केला आहे.जनावरांसाठी चाºयाची समस्या निर्माण होवू नये, यासाठी ओलीताची सोय असणाºया शेतकºयांना चारा उत्पादनासाठी बियाणे उपलब्ध करुन देऊन मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे चारा टंचाईच्या समस्येवर मात करण्यास मदत होणार आहे.- राजेश वासनिक, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प. गोंदिया.