शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

औषध निर्माते जाणार बेमुदत संपावर

By admin | Updated: June 23, 2014 00:08 IST

आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करावी या व इतर मागण्यांसाठी शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटना आपल्या

आजपासून आंदोलन : केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करागोंदिया : आरोग्य सेवेतील औषध निर्माण अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात केंद्र शासनानुसार वेतनश्रेणी लागू करावी या व इतर मागण्यांसाठी शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटना आपल्या आंदोलनाची सुरूवात सोमवारपासून (दि.२३) करीत आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास ३० जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सदर संघटनेने कळविले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा सन २००९ प्रमाणे विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर संप राज्यस्तरावर होणार असून राज्यातील सर्व जिल्ह्यात शासकीय औषध निर्माता गट ‘क’ कर्मचारी संघटनेच्या सर्व शाखा जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक धरणे आंदोलन करणार आहे. या संघटनेची गोंदिया शाखा सोमवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. यानंतर २५ जून रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन व त्यानंतरही शासनाने संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास ३० जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे सदर संघटनेने कळविले आहे. प्राप्त माहितीनुसार, ९ जुलै २००९ रोजी सदर संघटनेने आपल्या मागण्यांसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालय व १५ जुलै २००९ रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले आहे. यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्य सचिव यांनी त्यांना मागण्यांच्या पूर्ततेबाबत आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यावेळी संप मागे घेण्यात आला होता. मात्र आजपावेतो मागण्यांची शासकीय पातळीवर आश्वासनांच्या पूर्तीबाबत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे औषध निर्माण अधिकारी संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सन २००९ पासून मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानेच सदर संघटनेने आता बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यात ३९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतील ३९ औषध निर्माते, सहा ग्रामीण रूग्णालयातील औषध निर्माते, याशिवाय केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील सर्व नियमित व कंत्राटी औषध निर्माते या संपात सहभागी होणार आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माण अधिकारी संवर्गास केंद्र शासनाच्या निर्णयानुसार १ जानेवारी २००६ पासून प्रारंभिक वेतन श्रेणी लागू करण्यात यावी. औषध निर्माण अधिकाऱ्यांना संपूर्ण सेवाकाळात पदोन्नतीच्या संधी नाहीत, त्यांना पदोन्नतीच्या सेवा उपलब्ध कराव्यात, फॉर्मसी अ‍ॅक्ट १९४८ कलम ४२ चे उल्लंघन टाळण्यासाठी ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयात कमी करण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी पदांची पुनर्निर्मिती करून पूर्ववत दोन पदे कायम करावी, सेवा प्रवेश नियम अद्ययावत करावे, औषध निर्माण अधिकाऱ्यांना उच्च शिक्षणासाठी सेवेत कार्यरत असताना केंद्र शासनाने मान्यता प्रदान केलेला बी.फॉर्म. कोर्स लागू करावा, एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांना सात हजार ऐवजी २० हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे तसेच एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी सेवेवर घेण्यात येणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्यांना अनुभवाच्या आधारे नियमीत पदावर नियुक्तीमध्ये सरसकट प्राधान्य द्यावे किंवा रिक्त पदी त्यांचा समावेश करावा या व इतर मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)