शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

चालक-वाहकांच्या कमीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:36 IST

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद असला तरी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे यावर्षीच्या उन्हाळी हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत कमी फेऱ्या सुरू करण्यात आल्या. याचा परिणाम आगारांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.दिवाळी व उन्हाळ्याच्या ...

ठळक मुद्देउत्पन्नात घट होण्याची शक्यता : मानव विकास कार्यक्रमच्या बसेस प्रवासी सेवेत

देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुरक्षित प्रवासाचे ब्रिद घेवून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस संचालित करण्यासाठी गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद असला तरी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे यावर्षीच्या उन्हाळी हंगामात मागील वर्षीच्या तुलनेत कमी फेऱ्या सुरू करण्यात आल्या. याचा परिणाम आगारांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.दिवाळी व उन्हाळ्याच्या सुट्या तथा लग्नसराई यामुळे एसटीच्या प्रवासाला या दिवसांत चांगलाच प्रतिसाद मिळतो. याच कालावधीत आगारांचे उत्पन्नसुद्धा अधिक होते. अन्यथा आगारांना अधिक उत्पन्नाची मजल गाठणे कठिण जाते. उन्हाळ्यात बाहेरगावी जाणाऱ्या व बाहेरगावावरून येणाºया प्रवाशांकडून एसटी प्रवासाला चांगली पसंती मिळत असल्याचे मागील अनेक वर्षांच्या आकडेवारीवरून दिसून येते.परंतु यंदा गोंदिया व तिरोडा आगारात चालक-वाहकांची पदे रिक्त असल्याने उन्हाळी नियोजन लांबणीवर गेले आहे. मात्र शाळा बंद झाल्यावर मानव विकास कार्यक्रमांतर्गत धावणाºया ‘स्कूल बसेस’ १६ एप्रिलपासून प्रवासी सेवेत लावण्यात आल्या आहेत. त्यांचे चालक-वाहकही उपलब्ध झाले आहेत. उन्हाळी हंगामासाठी अतिरिक्त बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत या फेºया कमीच आहेत.गोंदिया आगारात एकूण ९० बसेस आहेत. त्यापैकी २८ बसेस मानव विकास कार्यक्रमाच्या असून त्या ‘स्कूल बसेस’ म्हणून धावत होत्या. आता शाळा बंद असल्याने त्या प्रवासी सेवेत आहेत. चालकांची १५५ व वाहकांची १५५ पदे मंजूर आहेत. मात्र प्रत्यक्ष चालक १२८ व वाहक ११६ आहेत. मात्र सहा कर्मचारी असे आहेत जे चालक व वाहक या दोन्ही पदांवरील काम सांभाळतात. शिवाय मागील अनेक वर्षांपासून वाहतूक अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून तो प्रभार भंडारा जिल्ह्यातील वाहतूक अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आला आहे. तर तिरोडा आगारात एकूण बसेस ४८ असून यापैकी ७ मानव विकास कार्यक्रमाच्या स्कूल बसेस आहेत. येथे ७० चालक कार्यरत आहेत. त्या तुलनेत वाहकांची पाच पदे रिक्त असल्याने ६५ पदे कार्यरत आहेत.या प्रकारामुळे त्यांना ओव्हरटाईम करावा लागतो. प्रसंगी वाहकाची प्रकृती अस्वस्थ असली किंवा त्याने ओव्हरटाईम करण्यास नकार दिला तर मात्र फेरी रद्द करण्याची पाळी येते. चालक-वाहकांच्या पदांच्या कमतरतेचा परिणाम उन्हाळी हंगामाच्या नियोजनावर पडल्याचे दिसून येत आहे.प्रवाशांची गर्दी, मात्र फेऱ्या कमीराज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मागील वर्षी ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबविण्यात आले होते. तसेच लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यापेक्षा ग्रामीण भागात फेºया वाढविण्यात याव्या, असे आदेश आगारांना देण्यात आले होते. त्यानुसार उपाययोजना करण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र यावर्षी कर्मचारी कमरतेमुळे स्थानिक पातळीवर लांब पल्ल्यांच्या बसेस कमी प्रमाणात असून ग्रामीण भागातही फेºया कमीच असल्याची प्रवाशांची ओरड आहे. उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी बघता फेºया कमी असल्याने गोंदिया आगारातून आणखी काही बसफेºया सुरू करण्याची मागणी आहे.लांब पल्ल्याचा ६ बसेस सुरूकर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या वर्षी उन्ह्याळ्यात लांब पल्ल्याच्या केवळ सहा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. यात पाच गोंदिया-नागपूर बसेस असून असून एक गोंदिया-अमरावती बसफेरी असल्याचे सांगण्यात आले आहे.१० चालक व २१ वाहकांचा अभावएसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गोंदिया आगारात १० चालक व २१ वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे वाहकांवर ओव्हरटाईम करण्याची पाळी येते. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.