शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बोरगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई

By admin | Updated: May 6, 2017 00:56 IST

शिलापूर ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्र.१ मध्ये मागील महिनाभरापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

गावातील बोअरवेल बंद : गावकऱ्यांची भटकंती लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव (डवकी) : शिलापूर ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्र.१ मध्ये मागील महिनाभरापासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.दोन बोअरवेल बंद अवस्थेत पडलेल्या असल्यामुळे लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळा येताच ग्रामीण भागात पाणी पेटू लागते. त्यानुसार येथील वॉर्ड क्रमांक १ मध्ये मागील एक महिन्यापासून पाणी टंचाईर् निर्माण झाली आहे. वॉर्डातील दोन बोअरवेल बंद पडून आहे. त्यामुळे वॉर्डवासीयांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. दुसरीकडे बोअरवेल आहे. पण त्या बोअरवेलचे पाणी गढूळ निघत आहे. ज्या बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य आहेत त्या ठिकाणी खुप गर्दी असते. नंबर लावण्यासाठी एकमेकासोबत हरेरावी होते. याकडे ग्रामपंचायत ही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. गावातील लोकांनी खेमराज राऊत, घनशाम गावराने, सेसराम, व्यंकट गावराने, विनोद काळसर्पे, पुरुषोत्तम राऊत, प्रेमलाल भोयर, भोजराज ठाकरे यांनी या बोअरवेल दुरुस्तीसाठी प्रयत्न केले मात्र पाईप नसल्यामुळे त्या बोअरवेल त्याच अवस्थेत बंद पडल्या आहेत. गावातील लोकांनी ग्राम पंचायत सदस्यांना याबाबत सुचना दिली. मात्र आतापर्यंत बोअरवेल ज्या अवस्थेत आहेत त्याच अवस्थेत दिसून येत आहेत. मात्र ग्रामपंचायतच्या निष्काळजीपणामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. ग्राम पंचायत सदस्यांना गावातील लोकांनी पुन्हा विनंती केली पण त्यांनी पंचायत समिती देवरी येथे बोअरवेल पाईप नसल्यामुळे ही बोअरवेल दुरुस्त होऊ शकणार नाही असे सांगितले. या लेटलतीफीमुळे मात्र गावकरी पाण्यासाठी भटकत आहेत.