शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गटारे देत आहेत अपघाताला आमंत्रण

By admin | Updated: August 26, 2014 23:32 IST

शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता नगर प्रशासनाच्या वतीने गटारे व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बहुतेक गटारांवरील झाकणे गायब असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची

गोंदिया : शहरातील सांडपाण्याचा निचरा होण्याकरिता नगर प्रशासनाच्या वतीने गटारे व नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र बहुतेक गटारांवरील झाकणे गायब असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील नाल्यांमध्ये केरकचरा रस्त्यांवर पडलेला आहे. मात्र या कचऱ्याचे देखील अद्यापही विल्हेवाट लावण्यात आली नाही. त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत शहरातील विकास कामे होत नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहे. शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र या नाल्यांची नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. काही मुख्य मार्गावर गटारे असून त्यावरील छाकणे गायब झाली असल्याने या गटारांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गटारांवर झाकणे लावण्यात यावी तसेच नाल्यांची साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील नागरिकांच्या वतीने नगर परिषदेकडे करण्यात आली होती. मात्र न.प.चे याकडे दुर्लक्ष झाले आहे. नाल्यांचा उपसा झाला नसल्याने नाल्यांमधील घाण पाणी रस्त्यांवर व नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे विविध साथरोगांची देखील लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, शहरातील काही वॉर्डात येण्याजाण्याच्या मार्गावर मोठी मोठी गटारे तयार झाली असल्याने नागरिकांना ये-जा करताना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर मुख्य मार्गावर खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. सदर समस्या मार्गी लावण्याकरिता न.प.कडून विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये न.प. प्रशासनाप्रती रोष व्याप्त आहे. (शहर प्रतिनिधी)