शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

दुष्काळाच्या मुद्द्यावरून गाजली ‘डीपीसी’

By admin | Updated: July 10, 2014 23:38 IST

जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना

शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी : गोंदियातील उड्डाणपुलाचे १२ ला लोकार्पणगोंदिया- जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देण्याचा मुद्दा सर्वांनी उपस्थित केल्याने त्याबाबतचा ठराव एकमताने संमत करण्यात आला. याशिवाय इतरही मुद्द्यांवर यावेळी चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच गोंदियातील उड्डाणपुलाचे लोकार्र्पण १२ जुलै रोजी होणार असल्याची माहिती पालक मंत्री देशमुख यांनी दिली.संपूर्ण राज्यभरात पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्येवर शासनस्तरावर उपाययोजना करण्यात येतील. शिवाय शेतकऱ्यांना आवश्यक ती बियाणे व खते यांचेही योग्य प्रमाणात नियोजन करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी कृषी विभागाला दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, आ.राजेंद्र जैन, आ.गोपालदास अग्रवाल, आ.डॉ.खुशाल बोपचे, आ.राजकुमार बडोले, आ.रामरतन राऊत, अपर मुख्य सचिव तथा पालक सचिव पी.एस.मीना, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य अ‍ॅड.मधुकरराव किंमतकर, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला शेतकऱ्याच्या समस्येला हात घालण्यात आला. भाताच्या जिल्ह्यात पाऊस नसल्याने पहिल्या पेरण्या जळाल्या. दुबार पेरणीचे संकट जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर ओढवले असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपाययोजना करून या समस्या सोडविण्यात याव्या अशी मागणी आ.डॉ.बोपचे व आ.जैन यांनी केली. यावर येत्या दोन-तीन पाऊस न आल्यास दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्यात येईल, असे पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील पीक परिस्थीतीचा आढावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी घेतला. ९ जुलैपर्यंत फक्त ३२ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्याच्या नर्सरीतील पिकांची ७० टक्के रोपे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे अश्या शेतकऱ्यांनी ८४०० हेक्टरवर रोवणी केली आहे. यावर या समस्येवर उपाययोजना करण्याबरोबरच कृषी विभागाने बियाणे, खतांचे नियोजन करण्याबाबतचे निर्देश पालक सचिव यांनी कृषी विभागाला दिले. गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करून असा ठराव राज्य शाासनाकडे प्रस्तावित करावा अशी मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली व पालकमंत्री देशमुख यांनी ती मागणी मान्य करून शासनाकडे ती प्रस्तावित करण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीला विष्णु बिंझाडे, मिलनदास राऊत, रुपाली टेंभुर्णे, जागेश्वर धनभाते, राजेश चतुर, राजेश चांदेवार, कुंदन कटरे, बालकृष्ण पटले, पारबता चांदेवार, देवकी नागपुरे, जगदिश बहेकार, रमेश लिल्हारे आदी नियोजन समिती सदस्य उपस्थित होते.