शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

सूर्याटोला मैदान बनला दारूड्यांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:02 IST

शहरातील सूर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीला येथे दारूड्यांचे टोळके बसून आपला शौैक पूर्ण करीत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देपरिसरातील नागरिक झाले त्रस्त : तक्रार करूनही पोलिसांचे दुर्लक्ष, कारवाईकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील सूर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनला आहे. रात्रीला येथे दारूड्यांचे टोळके बसून आपला शौैक पूर्ण करीत आहेत. दररोजच्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. यावर नागरिकांनी रामनगर पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र रामनगर पोलिसांकडून यावर काहीच कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. परिणामी, समस्या कायम आहे.बारमध्ये बसून दारू पिणे हे आता सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही. अशात दारूचे शौकीन मोकळी जागा बघून आपले शौक पूर्ण करीत आहेत. असाच काहीसा प्रकार सुर्याटोला परिसरातील रावजीभाई समाजवाडी समोरील मैदानात सुरू आहे. रावजीभाई समाजवाडी समोर मोठे मैदान आहे.या मैदानावर परिसरातील मुले खेळतात. तर वयस्क व वृद्ध सकाळी-सायंकाळी पायी फिरतात. जेवण झाल्यावर काही जण या मैदानात शतपावली करायचे. मात्र या मैदानावर आता दारूड्यांचे टोळके बसून दारू पित असतात. दारू पिऊन शिवीगाळ व आरडाओरड करण्यासारखे प्रकार घडत असल्याने नागरिकांना आता मैदानात जाणे कठीण झाले आहे. रात्री ८.३० वाजतानंतर रस्ताने वाहतूक कमी होताच दारुडे मैदानात आपला तळ ठोकून दारू पित बसतात.यावेळी त्यांची आपसांत वादावादी व शिवीगाळ ही होत असल्याने परिसरातील नागरिक विशेषत: महिलांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण होत आहे.परिसरातील नागरिकांनी हा प्रकार बंद व्हावा यासाठी रामनगर पोलिसांत लेखी तक्रार दिली. मात्र पोलिसांकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही.कित्येक नागरिक झाले जखमीमैदानात दारूडे दारू पिवून झाल्यावर दारूच्या बॉटल्स तेथेच फोडत असल्याने मैदानात सर्वत्र काचेचे तुकडे पसरले आहेत.यामुळे मैदानात खेळणाऱ्या मुलांसह नागरिकांनाही काचांमुळे जखम झाली आहे. सध्या उन्हाळ््याच्या सुट्या सुरू आहेत. अशात परिसरातील लहान मुले मैदानात खेळायला जातात मात्र काचांच्या तुकड्यांमुळे काहींच्या पायाला काचामुळे जखमी झाली आहे. परिणामी पालक मुलांना मैदानात पाठविण्यात घाबरत आहेत. शिवाय पायी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांनाही काचांमुळे त्रास झाला आहे.दारुड्यांवर कारवाईकडे दुर्लक्षमोकळी व सुनसान जागा बघून तेथेच आपले शौक पूर्ण करण्याचे प्रकार शहरात सर्वत्रच सुरू आहेत. बारमध्ये बसून दारू पिण्यासाठी जास्त पैसे लागतात. अशात कमी पैशांत आपला शौक पूर्ण करण्यासाठी शौकांनानी असे मैदान व सुनसान रस्ते आपले अड्डे बनविले आहेत. सुर्याटोला मैदानच काय शहरातील प्रत्येकच मैदान, बायपास व रिंगरोड सध्या दारूड्यांचे अड्डे बनले आहेत. अंधार पडताच शौकीन आपले शौक पूर्ण करण्यासाठी जमत असल्याचेही दिसत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष आहे.परिणामी,या शौकिनांना कुणाचाही धाक उरलेला नाही.

टॅग्स :liquor banदारूबंदी