शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कमी टक्क्यांत कर्जाचा मॅसेज आला तर ॲप डाऊनलोड करू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

गोंदिया : सगळेकडे पैशाची चणचण असल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणून कर्ज देण्याच्या नावावर लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. आपल्याला ...

गोंदिया : सगळेकडे पैशाची चणचण असल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणून कर्ज देण्याच्या नावावर लुटणारी टोळी सक्रिय झाली आहे. आपल्याला इतक्या रकमेचे कर्ज मंजूर झाले आहे. त्या कर्जासाठी तुम्ही पात्र ठरले आहात असे सांगणारे मॅसेज किंवा कॉल आला तर त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. कारण हा कॉल करणारे लोक फसवणूक करणाऱ्या टोळीतील लोक आहेत. ते आपल्याला कर्ज देण्याच्या नावावर लाखोचा गंडा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कर्जासाठी थोडी कार्यवाही केली की थेट तुमच्या खात्यात कर्ज असे सांगून लोकांची फसवणूक केली जाते. एखाद्या व्यक्तीने कर्जाची गरज आहे असे सांगितल्यावर त्या व्यक्तीला ते लोक हळूहळू त्यांच्याशी जवळीक साधून त्यांना गंडवितात. सुरुवातीला काही माहिती हवी आहे असे सांगून जवळीक साधतात त्यानंंतर त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवितात. त्या मॅसेजमध्ये एक लिंक असते त्या लिंकला ओपन करून नका अन्यथा आपल्या खात्यातील पैसे गायब होतील.

......................................

ही घ्या काळजी

१) कर्ज घेण्यासाठी मोबाईल ॲपचा वार करू नका अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते.

२) आपल्याकडून घेण्यात येणाऱ्या वैयक्तिक माहितीचा गैरवापरदेखील होऊ शकतो.

३) कर्ज देणारी बॅंक कर्ज देण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया केल्यावरच कर्ज देते अन्यथा देत नाही याकडे लक्ष द्यावे.

.....................

ॲप डाऊनलोड करताच बॅंकेच्या खात्यातील रक्कम गायब

१) आपल्याला कर्ज मंजूर झाले ते कर्ज उचण्यासाठी आपल्याला ॲप डाऊनलोड करावा लागेल असे सांगितले जाते. ते ॲप डाऊनलोड करणाऱ्याच्या खात्यातील संपूर्ण रक्कम गायब होत आहे.

२) आपल्या खात्यात पैसेच नाहीत तर आपली फसवणूक कशी करणार असे आपल्याला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. ते फसवणूक करणारे लोक इतरांकडून फसवणूक केलेला पैसा आपल्या खात्यात ठेवू शकतात, यासाठी सजग रहा.

३) कायद्याच्या चौकटीत राहून सर्वांना आपापली कामे करायची असतात. परंतु अटी आणि शर्तीचे पालन न करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवून त्यांना लुटले जाऊ शकते.

..........................

असे तुम्हीही फसू शकता

केस १) गोंदियातील एका गृहस्थाच्या फोनवर मॅसेज आला. त्यांना पैशाचीही गरज होती. प्लाॅट घेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने आपल्याला सहज कुणी कर्ज देईल तर बरे होईल अशी त्यांची मनीषा होती. तशाच परिस्थीतीत आलेल्या मॅसेजच्या आमिषाला ते बळी पडले आणि त्यांचे पैसे काढण्यात आले.

....

केस २) एका महिलेला गृहउद्योगासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज हवे होते. परंतु कर्ज घेण्यापेक्षा पैशाची जुळवाजुळव करू अशी त्यांची धारणा होती. तर दुसरीकडे आपला गृहउद्योग लवकर सुरू झाला तर आपल्याला पैसे लवकर येतील यासाठी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू असे वाटत होते. त्यांना कर्ज देण्याच्या नावावर आलेल्या मॅसेजला वाचल्यावर लिंक उघडली असता त्या मॅसेसाठी त्यांना फाॅलोअप घेणारे कॉल आले आणि त्यांची दहा हजाराने फसवणूक झाली.

......................

या आमिषाला बळी पडू नका

-कर्ज घेण्यासाठी कागदोपत्री कार्यवाही करावी लागते. परंतु कागदपत्रे न मागताच सहजरीत्या कर्ज देण्याचे कुणी आमिष देत असेल तर आपल्याला वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

- पॅन कार्ड, आधार कार्ड द्या कर्ज देतो कुणी म्हणत असेल तर ते सपशेल खोटे आहे. कुठल्याही गॅरंटीशिवाय आपल्याला कर्ज कुणी देणार नाही.

- कमी व्याजदराच्या आमिषात अडकवून चक्रवाढीने व्याज वसूल केला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

................

कर्जाची गरज जरी असली तरी कुणीही प्रत्येक बॅंक किंवा संस्थेशी थेट संपर्क केल्याशिवाय कुठलीही लिंक ओपन करू नये, आपली फसवणूक तर होणार नाही, हा भाव आधी मनात आणावा. त्यानंतरच पुढचे काम करावे. बॅंकेच्या अधिकाऱ्यांना भेटावे. आपण आमिषाला बळी पडले की आपले नुकसान होईल.

- तेजस्विनी कदम, सायबर सेल प्रमुख