शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणापूर्वी रक्तदान करा, अन्यथा होणार रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST

रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मगील वर्षांपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार. करिता रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांनतर लस घ्यावी, असे रक्तपेढीतून कळविले जात आहे. 

ठळक मुद्देरक्तपेढीत होतोय तुटवडा : दररोज ३० ते ३५ युनिट रक्ताची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ३५ रुग्णांना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. सिकलसेल, थैलीसीमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेचे असून, रक्ताची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे, तर रक्त संकलनाचे प्रमाण अत्यल्प असून, करे तरी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन केले जाते. त्यात मगील वर्षांपासून कोरोनामुळे शिबिरांचे आयोजन मंदावले आहे. त्यात आता कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तीला त्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. अशात येथील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होणार. करिता रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांनतर लस घ्यावी, असे रक्तपेढीतून कळविले जात आहे. आधीच रक्तदाते कमी असून, त्यात मागील वर्षीपासून कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदानासाठी नागरिक पुढे येत नसल्याचे दिसत आहे. अवघ्या राज्यातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. अशात येथील एकमेव शासकीय रक्तपेढीतही कित्येकदा रक्ताचा तुटवडा जाणवला होता. अशात काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून येथील रक्तपेढीची गरज भागविण्यात आली. अशात कसे तरी वर्ष निघून गेले. मात्र आता कोरोना लस आली असून, मोठ्या प्रमाणात नागरिक लस लावून घेत आहेत. यामध्ये युवकांचे प्रमाणही अधिक असून, रक्तदान करणारे हे युवकच आहेत. मात्र एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. म्हणजेच हजारोंच्या संख्येत लस घेणारे युवक रक्तदान करू शकणार नाही. असे झाल्यास रक्तपेढीला रक्ताचा पुरवठा बंद पडणार व ही बाब गंभीर आहे. येथील बाईं गंगाबाई रूग्णालयातील शासकीय रक्तपेढीतूनच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतील गरजूंनाही रक्ताचा पुरवठा केला जातो. मात्र रक्तपेढीलाच रक्तदाते न मिळाल्यास याचे गंभीर परिणाम पडणार. करिता लसीकरणापूर्वी युवकांनी रक्तदान करावे, असे रक्तपेढीकडून कळविण्यात आले आहे. 

युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४५ ते ५० वर्ष वयोगटातील खूप लोक आहेत. ते आता लस घेत असल्याने त्यांना पुढचे २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी आपली सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी  रक्तदान करणे गरजेचे आहे. लस घेण्याच्या तयारीत असलेल्या लोकांनी आधी रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे. शासकीय रक्तपेढीत मोजकाच साठा येथील शासकीय रक्तपेढीत दररोज ३० ते ३५ युनिट रक्ताची मागणी असते. शनिवारी येथील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयातील रक्तसंकलन केंद्रात १३९ युनिट रक्त शिल्लक होते. यामध्ये ए-पॉझिटिव्ह ३०, ए-निगेटिव्ह १, बी-पॉझिटिव्ह ४०, बी-निगेटिव्ह १, ओ-पॉझिटिव्ह ५५, ओ-निगेटिव्ह ०, एबी-पॉझिटिव्ह ११, एबी-निगेटिव्ह रक्त गटाची १ युनिट उपलब्ध होती. 

मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनामुळे रक्तदान नाहीच्याच बरोबर होत आहे. परंतु रक्ताचा तुटवडा पाहून करण्यात आलेल्या आवाहनामुळे सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांनी पुढे येऊन रक्तदान केले. त्यामुळे रक्ताची मागणी असणाऱ्या रुग्णांचा जीव वाचविता आला. आता कोरोनाचे लसीकरण होत आहे. या लसीकरणासाठी कोरोनाची प्रतिबंधित लस घेणाऱ्यांना २ महिन्यांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. अशात त्यांनी लसीकरण करण्यापूर्वीच रक्तदान करावे. -डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी गोंदिया

 

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीCorona vaccineकोरोनाची लस