शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कुत्र्याने वाचविले अस्वलाच्या हल्ल्यातून मालकाचे प्राण, गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा येथील घटना

By अंकुश गुंडावार | Updated: February 27, 2025 21:49 IST

Gondia News: अंगणात उभे असलेल्या मालकावर अस्वल अचानक हल्ला करते, अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मालकाची धडपड सुरू असते. मालक आरडाओरड करताच त्यांचा घरी पाळलेला कुत्रा मालकाच्या मदतीला धावून येतो आणि मालकाची सुटका करेपर्यंत अस्वलावर हल्ला करत राहतो, अशी थरारक घटना घडली आहे.

गोंदिया - अंगणात उभे असलेल्या मालकावर अस्वल अचानक हल्ला करते, अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी मालकाची धडपड सुरू असते. मालक आरडाओरड करताच त्यांचा घरी पाळलेला कुत्रा मालकाच्या मदतीला धावून येतो. अस्वलावर हल्ला करून त्याच्या तावडीतून मालकाची सुटका करण्याचा प्रयत्न करतो, अस्वल मालकाला सोडेपर्यंत कुत्रा आपली झटपट सुरूच ठेवतो आणि अखेर अस्वलाच्या तावडीतून मालकाची सुटका करून अस्वलाचा पाठलाग करून त्याला जंगलाच्या दिशेने परतावून लावतो. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखीच घटना बुधवारी (दि.२६) रात्री गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा येथे घडली. राजेश हरिचंद चनाप असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मालकाचे नाव आहे.

गोरेगाव तालुक्यातील बोळूंदा हे गाव नागझिरा अभयारण्याला लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास राजेश चनाप हे आपल्या अंगणात उभे होते. दरम्यान, अचानक त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. यानंतर त्यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या येथील कुत्र्याने अस्वलाच्या दिशेने धावत घेत त्याच्यासह झटापट करीत अस्वलाला जंगलाच्या दिशेने परतावून लावले. चनाप यांचा पाळीव कुत्रा वेळीच मालकाच्या मदतीला धावून आल्याने राजेश चनाप यांची अस्वलाच्या तावडीतून सुटका होऊन त्यांचे प्राण वाचले. दरम्यान, हा प्रकार चनाप यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी लगेच जखमी राजेश चनाप यांना उपचारार्थ गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती गोरेगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. तसेच याचा अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठविला.

मुक्या जनावराची अशी ही मायाकुत्र्याला प्रामाणिक प्राणी म्हटले जाते. ते ज्याच्यावर जीव लावतात त्याचे जीव वाचविण्यासाठी आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. बोळूंदा येथील राजेश चनाप यांच्या घरी पाळलेल्या कुत्र्याच्या बाबतीत हे खरे ठरले. अस्वलाशी दोन हात करून त्यांच्या कुत्र्याने मालकाचे प्राण वाचविले. त्यामुळे त्यांच्या कुत्र्याचे कौतुक होत आहे.

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराबोळूंदा परिसरात मागील काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :dogकुत्राwildlifeवन्यजीव