गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या छोटा गोंदियाच्या भीमघाट पांगोली नदीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे बचाव पथक पांगोली नदीत सराव करीत असताना त्यांंना जो महिलेचा मृतदेह आढळला त्या महिलेचा २५ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असल्याचे उत्तरीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. छाया सुधाकर ठाकरे (४५), रा. प्रगती कॉलनी छोटा गोंदिया, असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे तिने टेन्शन घेतले होते. ती मागील एक महिन्यापासून बेपत्ता होती. तिच्या नातेवाइकांनी ३० जून रोजी ती बेपत्ता असल्याची माहिती गोंदिया शहर पोलिसांत दिली होती. मंगळवारी (दि.२७) दुपारी २ वाजता मृतदेह बचाव पथकाला मिळाल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा कयास लावला जात आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे करीत आहेत.
डॉक्टर म्हणतात की तो मृतदेह २५ दिवसांपूर्वीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST