शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

Corona Virus in Gondia; गोंदियातील मेडिकलमध्ये डॉक्टरांच्या प्रोटेक्शन किटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 18:19 IST

सध्या गोंदिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये १२०० प्रोटेक्शनची किटची गरज असताना केवळ ३० किट उपलब्ध असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर बाजारपेठेत सुध्दा याचा तुटवडा असल्याने वितरकांकडून पुरवठा होत नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देगरज १२०० ची उपलब्ध केवळ ३०डॉक्टरांसमोर समस्या : कोरानाचा प्रादुर्भाव

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) सध्या एका कोरोना बाधीत रुग्णावर उपचार सुरू आहे. मात्र रुग्णावर उपचार करताना त्याचा डॉक्टरांना संसर्ग होऊ नये,यासाठी प्रोटेक्शन किटचा वापर केला जातो. मात्र सध्या येथील मेडिकल कॉलेजमध्ये १२०० प्रोटेक्शनची किटची गरज असताना केवळ ३० किट उपलब्ध असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. तर बाजारपेठेत सुध्दा याचा तुटवडा असल्याने वितरकांकडून पुरवठा होत नसल्याची माहिती आहे.देशासह राज्यात सध्या कोरोनाचा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील रुग्णांचा आकडा १९७ वर पोहचला आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांची गर्दी सुध्दा दररोज वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. बहुतेक जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षाविषयक साधना अभावी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गोंदिया येथे शुक्रवारी कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली. कोरोना बाधीत रुग्णावर सध्या मेडिकलमधील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू असून त्याच्यावर मेडिकलचे डॉक्टर उपचार करीत आहेत. सुदैवाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नसून १३ जणाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ९ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोना बाधीत आणि संशयीत रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांना सुध्दा आवश्यक ती खबरदारी घ्यावी लागते. यासाठी त्यांच्यासाठी प्रोटेक्शन किट असते. मात्र येथील वैद्यकीय महाविद्यालयात १२०० प्रोटेक्शन किटची गरज असताना सध्या केवळ ३० किट उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील व्यवस्थापनासमोर देखील मोठा पेच निर्माण झाला आहे. मेडिकल कॉलेजची यंत्रणा मागील आठवडाभरापासून प्रोटेक्शन किट कुठून उपलब्ध होतेय का याचा शोध घेत आहे. मात्र रविवारपर्यंत ते उपलब्ध झाले नव्हते. तर एका वितरकाशी मेडिकलने संपर्क साधला असता डॉक्टरांसाठी लागणाºया प्रोटेक्शन किटचा सध्या पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान मेडिकलला डॉक्टरांसाठी लागणारे प्रोटेक्शन किट उपलब्ध न झाल्यास बाधीत रुग्णावर उपचार करणाºया डॉक्टरांच्या आरोग्याचा सुध्दा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत आहे. यासंदर्भात मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांच्याशी संपर्क साधला असता दोन दिवसात डॉक्टरांसाठी लागणारे प्रोटेक्शन किट उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.नियोजनाचा अभावराज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता येथील मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने डॉक्टरांसाठी लागणाºया प्रोटेक्शनची किटची मागणी करुन ठेवण्याची गरज होती. मात्र ही बाब फारशी गांर्भियाने न घेतल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे बोलल्या जाते.विशेष मेडिकल कॉलेजमध्ये यापूर्वी सुध्दा अनेकदा औषधांचा पुरवठा न झाल्याने समस्या निर्माण झाली होती.थकीत देयकाचा प्रश्न कायममेडिकल कॉलेजला हॉफकिन्स कंपनीकडून औषधांचा पुरवठा करण्यात येतो.तर कधी वेळेत औषधे उपलब्ध न झाल्यास मेडिकल व्यवस्थापन स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी करते. मात्र औषधांचा पुरवठा करणाºया कंपन्याची पाच ते सहा कोटी रुपयांची देयके गेल्या वर्षभरापासून थकली असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस