शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
3
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
4
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
5
IND vs WI : टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
6
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
7
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
8
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
9
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
10
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
11
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
12
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
13
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
14
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
15
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
16
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
19
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
20
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?

हत्तींच्या कळपाच्या मार्गात अडथळा निर्माण करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 23:01 IST

हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करताना शेत शिवारातून बऱ्याचदा जातात. परिणामी शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी हत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास त्वरित वन कर्मचाऱ्यांशी किंवा वन कार्यालयाशी संपर्क करून नुकसानीबाबतचे अर्ज सादर करावे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  हत्तींचा कळप २५ सप्टेंबर रोजी रात्री अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील खोळदावरून बंद्या, महागाव, सिरोली नहर मार्गे बुटाई नहरापर्यंत आला. नंतर २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता अर्जुनी मोरगावसह-वनक्षेत्रातील बिट रामघाट १ कक्ष क्रमांक २५३ राखीव वनात प्रतापगड पहाडीवर हत्तींचे प्रत्यक्ष दर्शन झाले. सध्याचे स्थळ निरीक्षण केले असता, अंदाजे तीन मार्गांवरून हत्तींचे मार्गक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन गोंदिया वनविभागामार्फत गस्तीचे व बंदोबस्ताचे नियोजन केले. ज्या मार्गावरून हत्तीचा कळप जात असेल त्यात अडथळा निर्माण करू नये, अशा सूचना वन विभागाने केला आहे. हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनपरिक्षेत्रातून गोंदिया जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गाढवी नदी मार्गे २४ सप्टेंबरला प्रवेश करून वनविभागांतर्गत अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ७५३ खोळदा बिटामध्ये प्रवेश केला. हत्ती मार्गक्रमण करताना शेत शिवारातून बऱ्याचदा जातात. परिणामी शेतातील पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी हत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले असल्यास त्वरित वन कर्मचाऱ्यांशी किंवा वन कार्यालयाशी संपर्क करून नुकसानीबाबतचे अर्ज सादर करावे. वनविभागाकडून झालेल्या नुकसानीपोटी शासन निर्णयानुसार अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांनी दिली. जिल्ह्यात जंगली हत्तीचे आगमन अर्जुनी-मोरगाव तालुकावासीयांसाठी प‌र्वणीच ठरले आहे. मात्र नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त असल्याने त्यांना हे हत्ती नकोसे झाले आहेत. 

पश्चिम बंगालमधील हत्ती नियंत्रण पथक दाखलबुटाई, खैरी, सुकळी, बाराभाटी, कवठा, एरंडी, प्रतापगड, गोठणगांव, तिबेट कॅम्प, चिचोली, दिनकर नगर, कालीमाती, डोंगरगाव, कोहलगाव, जब्बारखेडा, धाबेपवनी मार्गे नवेगाव नॅशनल पार्क. हत्तींच्या नियंत्रणाकरिता रॅपिड रिस्पॉन्स टिम, नवेगावबांध, गोठणगाव अर्जुनी मोरगाव या तिन्ही वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी, विशेष व्याघ्र संरक्षण दल, पश्चिम बंगालमधील हत्ती नियंत्रण पथक यांचे संयुक्तपणे नियोजन केलेले आहे.

तर हत्ती बिथरू शकतातहत्ती एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वन क्षेत्रात मार्गक्रमण करतो व हे त्याचे नैसर्गिक आचरण असून अशा परिस्थितीत मानवी हस्तक्षेप त्याचे मार्गक्रमात न झाल्यास हत्ती शांततेत निघून जातात. हत्ती मार्गक्रमण करताना शेतशिवारातून बऱ्याचदा जातात अशावेळी शेतातील पिकांचे नुकसान होते. नागरिकांनी संयमाने हत्तींना त्यांचे मार्गक्रमणात सहकार्य करावे.

वनविभागाला द्या त्वरित माहिती गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या कळपात लहान पिल्ले असल्याने मोठे हत्ती मानवी हस्तक्षेपामुळे बिथरू शकतात. हत्ती बिथरल्यास नियंत्रणात आणने कठीण होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हत्तींच्या जवळ जाऊ नये, स्थानिक वनकर्मचाऱ्यांव्दारा वेळो-वेळी मिळालेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घाबरू नये. हत्तींची आपल्या क्षेत्रात हलचल आढळून आल्यास तात्काळ वनविभागास माहिती द्यावी. 

या सूचनांचे करा पालन सायंकाळी सूर्यास्तानंतर शेतात एकट्याने थांबू नये.  रात्रीच्या वेळी शेतांमध्ये जागणीकरिता जाऊ नये. हत्तींचा पाठलाग करू नये. हत्तीला बघण्यासाठी अथवा कुठल्याही कारणास्तव हत्तींच्या जवळ जाऊ नये. शेत पिकांचे नुकसान झाल्यास तत्काळ अर्ज करावे, वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येईल. हत्तींच्या मार्गांमध्ये अडथळा केल्यास तो जास्त विध्वंसक होतो, त्यामध्ये नुकसान टाळण्याकरिता खबरदारी घ्यावी.

 

टॅग्स :forest departmentवनविभागFarmerशेतकरी