शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 21:12 IST

स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनुसुचित जाती व अनुसूचित जमती या प्रवर्गावर अन्याय आणि अत्याचार होऊ नये म्हणून संविधानातील अ‍ॅट्रासिटी कायदा अंमलात आणला.

ठळक मुद्देसरपंच- उपसरपंचांची मागणी : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

ऑनलाईन लोकमतदेवरी : स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये अनुसुचित जाती व अनुसूचित जमती या प्रवर्गावर अन्याय आणि अत्याचार होऊ नये म्हणून संविधानातील अ‍ॅट्रासिटी कायदा अंमलात आणला. परंतु सदर जातीतील लोकांना समान अधिकार अजूनपर्यंत मिळालेले नसून आता अ‍ॅट्रॉसिटीच्या कायद्यात बदल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शासनाला दिले. त्यामुळे या कायदयात फेरबदल करु नये अशी मागणी तालुक्यातील सरपंच व उपसरपंचांनी केली असून सोमवारी (दि.२६) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रभारी उपविभागीय अधिकारी विजय बोरुडे यांच्या मार्फत पाठविण्यात आले.निवेदनातून, मागासवर्गीय लोकांना समान अधिकार मिळावे म्हणून केंद्रातील मागील युपीए सरकार व राज्यातील युती सरकारने अ‍ॅट्रॉसिटी कायदा अंमलात आणून मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्न केला. परंतु वर्तमान सरकारला अ‍ॅट्रॉसिटी कायदा शिथील करण्यास भारतीय सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले. हे पूर्णपणे असंवैधानिक आहे. या निर्णयामुळे पुन्हा मागासवर्गीय समाजावर अन्याय आणि अत्याचार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता या कायद्याला शिथील व फेरबदल करु नये अशी मागणी करण्यात आली आहे.हे निवेदन सोमवारी (दि.२६) जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील महिला-पुरुष सरपंच व उपसरपंचांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रभारी उपविभागीय अधिकारी बोरूडे यांच्यामार्फत पाठविण्यात आले. या शिष्टमंडळात सेडपारच्या सरपंच माधुरी राऊत, चिचेवाडाच्या सरपंच श्यामकला गावळ, पिंडकेपारच्या सरपंच प्रमिला घासले, पिंडकेपार-चिचगडच्या सरपंच ज्योती धानगाये, गडेगावच्या सरपंच अनिता वालदे, आलेवाडाच्या सरपंच गीता घासले, कन्हाळगावच्या सरपंच कौशल्या राऊत, पुराडाचे सरपंच रमेश साखरे, पलानगावचे सरपंच संजय राऊत, चिचगडच्या सरपंच कल्पना गोसावी, पालांदूर जमीचे उपसरपंच नुरचंद नाईक, पळसगावचे उपसरपंच उत्तम धानगाये यांच्यासह मोठ्या संख्येत सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.