शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दप्तराचे ओझे कमी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:42 IST

वयानुसार विद्यार्थ्यांवर त्यांच्या दप्तराचे ओझे भारी पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते. जिल्हा परिषद शाळांत या आदेशाची अंमलबजवणी होत असली तरी खाजगी व अन्य शाळांत मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देशासन आदेशाला बगल : खाजगी शाळांकडून अंमलबजावणी नाहीच

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वयानुसार विद्यार्थ्यांवर त्यांच्या दप्तराचे ओझे भारी पडू नये, यासाठी शिक्षण विभागाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश सर्व शाळांना दिले होते. जिल्हा परिषद शाळांत या आदेशाची अंमलबजवणी होत असली तरी खाजगी व अन्य शाळांत मात्र या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र आहे.चिमुकल्यांच्या खांद्यावरील दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खांद्यावर दप्तर टांगून शाळेत जात असताना त्यांना ते पेलवत नाही. या प्रकारावर आळा बसावा यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण विभागाचा हा निर्णय जिल्हा परिषद, नगर परिषद व खाजगी शाळांसाठीही बंधनकारक होता.जिल्हा परिषदेच्या शाळांत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी काही उपाय योजना करण्यात आल्या. महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार ‘दप्तर विरहीत दिवस’ म्हणून पाळला जात असल्याची माहिती आहे. मात्र खासगी शाळांकडून या निणर्याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. आजही खाजगी शाळांतील अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचा खच अधिक आहे.केजीतील चिमुकल्यांच्या वह्या-पुस्तके बघता ते महाविद्यालयातील विद्यार्थी असल्याचा भास होतो. शिक्षण विभागाकडून सुध्दा या निणर्याची शाळांकडून योग्य अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची पडताळणी केली जात नाही. त्यामुळे खासगी शाळांचे मनमानी धोरण कायम आहे.खासगी शाळा नियमांवर वरचढविद्यार्थ्यांच्या खांद्यावरील दप्तराचे ओझे कमी करता यावे यासाठी महिन्याचा चौथा शनिवार दप्तर विहरीत दिवस म्हणून घेण्याचे ठरले. जिल्हा परिषदेच्या शाळांत मागील सत्रात हा उपक्रम राबविण्यात आला. मात्र खाजगी शाळांत याला बगल देण्यात आल्याचेही दिसले. दप्तर विरहीत दिवसाला विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार कार्यक्रम आयोजीत करून त्यातून अभ्यास करणे अपेक्षीत होते. मात्र खाजगी शाळांत तसे काहीच झाले नाही व यंदाही होणे अपेक्षीत नाही. यातून खाजगी शाळांवर नजर ठेवून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करवून घेणे गरजेचे असल्याचे वाटते. कारण खासगी शाळा नियमांवरच वरचढ होत आहे.पाठीवर ओझं असल्याने पाठीच्या हाडांचा त्रास होऊ शकतो. पुढे जाऊन स्लीप डिस्क व त्यामुळे हात-पायांना कमजोरी येऊ शकते. दप्तराचे ओझे पाठीवर राहत असल्याने मानेला व सोबतच खांद्यांनाही त्रास होतो व कुबड निघू शकते. यापासून मानसीक त्रासही उद्भवतात. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.- डॉ. प्रदीप गुजर, बाल रोग विशेषतज्ञजिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षकांकडून हा उपक्रम राबविला जातो. यासाठी २०१७ मध्ये परिपत्रक काढले होते. आता यंदाही सर्व शाळांचा आढावा घेऊन या उपक्रमाची काटेकोरपण अंमलबजावणी करण्याच्या सूचना देऊ. खासगी शाळांनाही त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे.- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प.,गोंदिया