शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

योजनांची अंमलबजावणी करण्यास अडथळा

By admin | Updated: August 26, 2014 23:32 IST

गोंदिया जिल्ह्यातील पूर्व भागाला, आदिवासीबहुल अशा सालेकसा तहसील येथे पंचायत समिती स्वराज्य संस्था राबविण्यात येत आहे. येथून शासनाच्या विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यात येते,

दर्रेकसा : गोंदिया जिल्ह्यातील पूर्व भागाला, आदिवासीबहुल अशा सालेकसा तहसील येथे पंचायत समिती स्वराज्य संस्था राबविण्यात येत आहे. येथून शासनाच्या विविध योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यात येते, पण शासनाच्या हलगर्जीपणाने या पंचायत समितीला अतिदुर्गम भागात असलेली तहसीलची उपेक्षा होत आहे.शासकीय वाहन येथे उपलब्ध करण्यासाठी पंचायत समितीच्या सभापती छाया बल्हारे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा पाठवून तसेच सचिव ग्रामविकास जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त नागपुर यांना सुध्दा अशा/पत्र क. प्रसंसा/सभापती १२३६/२०१३ दि.३/६/२०१३ ला पत्र पाठवून पंचायत समितीत वाहन नसल्याने होणाऱ्या अडथळ्याची कल्पना दिली.पत्राच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. सालेकसा हे अतिसंवेदनशील नक्षल क्षेत्रात मोडत असून येथील शासकीय योजना राबविण्यास सद्यस्थितीत महिला सभापती १३ जानेवारी २०१३ पासून कार्यरत आहेत. या पंचायत समितीमध्ये असलेली वाहन नादुरूस्त स्थितीत असून निर्लेखणाच्या कार्यवाहीस प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयाकडून नवीन वाहन उपलब्ध करून देण्यास वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा सुध्दा करण्यात येत आहे. परंतू अजूनपर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नाही.अद्यापपर्यंत या कार्यालयास वाहन उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. वाहनाअभावी शासनाच्या विविध शासकीय कार्यक्रमात व सभेला तसेच शासकीय योजनांची पाहणी व अंमलबजावणी करण्यास स्वत:च्या दुचाकी वाहनाने दौरा करावा लागतो. हा एक महिला लोकप्रतिनिधीवर अन्याय होत आहे. या कामात लक्ष पुरवून या तातडीने पंचायत समिती सालेकसा या कार्यालयास अविलंब वाहन उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून शासनाच्या विविध योजना राबविणे सोयीचे होईल अशी मागणी त्यांनी केली आहे.(वार्ताहर)