शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खोडशिवणीत भूमिगत पूल नको; रेल्वे गेट द्या

By admin | Updated: September 12, 2016 00:21 IST

अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे.

खोडशिवणीचे नागरिक रस्त्यावर: २५ गावांतील लोकांची मागणीसडक-अर्जुनी : रेल्वे विभाग खोडशिवणी येथील रस्त्यावर भूमीगत पूल (बोगदा) बांधकाम करण्याच्या तयारीत आहे. या कामाला नागरिकांनी तिव्र विरोध केला आहे. या ठिकाणी मानव रहित गेट तयार करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून सदर बांधकामाच्या ठिकाणी अंतर्गत रस्ता किंवा मानव रहित गेट तयार करावी याकरीता चौकशी सुरू आहे. यापूर्वी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी देवरी यांनी रेल्वे प्रशासनासोबत भेट दिली. यावेळी परिसरातील सरपंच, पोलीस पाटलासह लोकांनी भूमीगत पूल (बोगदा) बांधकास विरोध दर्शवून तसेच ठराव सुध्दा कनिष्ठ अभियंता रेल्वे विभाग नागभीड यांना पाठविला आहे. सदर रस्ता साकोली-सडक-अर्जुनी या दोन्ही जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. सदर रस्त्याने २५ गावातील जड वाहने हजारोंच्या संख्येने ये-जा करतात. सदर ठिकाणी बोगद्याचे बांधकाम केल्यास नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होत नाही. कारण सदर बांधकामाची व रेल्वे स्टेशनला जाण्याकरीता पर्यायी रस्ता राहणार नाही. जागा समांतर पातळीवर आहे व ती तांत्रीक दृष्ट्या बोगदा बांधकामास अयोग्य आहे. बोगदा बांधकाम केल्यास ट्रक, ट्रॅक्टर व बस सारखे वाहनांच्या रहदारीवर परिणाम होईल. हा बोगदा परिसरातील नागरिकांना कायमचे डोकेदुखी ठरेल. रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याची योजना रेल्वे विभागाची असले तरी बोगदा बांधकामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागेल. रेल्वे विभागाने यापूर्वी कमी वर्दळीच्या ठिकाणी सौंदड, गोंडउमरी, पांढरी रस्ता, नागझिरा रोड येथे मानव रहित गेट तयार केले आहेत. याच ठिकाणी बोगदा बांधकामाचा आग्रह का केला जातो. गोंदिया-चंद्रपूर मार्गावर अनेक ठिकाणी बोगदे बांधले आहेत. तिथे पाणी साचल्यामुळे जाणे-येणे बंद आहे. त्यामुळे बोगदा बांधकामातील पैशाच्या लाभाचा विचार अधिकाऱ्यांनी स्वत:च्या स्वार्थाकरीता करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी रेल्वे विभागाने आठ ते दहा वेळा सर्व्हेक्षण करून नैसर्गिकरित्या पाण्याची निकासी होणार नाही असा रिपोर्ट दिला आहे. यापूर्वीच सदर रस्त्याच्या बाजूच्या दोन्ही गेट रेल्वे विभागाने बंद केल्या आहेत. त्यामुळे रहदाराची कायम समस्या निर्माण करणारा बोगदा तयार करू नये, जबरदस्तीने बोगदा बांधकाम केल्यास या परिसरातील नागरिक आंदोलन करतील याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे विभागावर राहील. (शहर प्रतिनिधी)