शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आणि अन्य जनजातींना आदिवासी प्रवर्गात स्थान देऊ नका

By admin | Updated: September 9, 2014 23:48 IST

इंडिया आदिवासी पिपल फेडरेशन शाखा तिरोडाच्या वतीने ६ सप्टेंबरला तहसील कार्यालय तिरोडा येथे मोर्चा काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रधानमंत्री, आदिवासी मंत्री यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार

इंदोरा/बुज. : इंडिया आदिवासी पिपल फेडरेशन शाखा तिरोडाच्या वतीने ६ सप्टेंबरला तहसील कार्यालय तिरोडा येथे मोर्चा काढून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रधानमंत्री, आदिवासी मंत्री यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार तिरोडा यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील आदिवासीमध्ये धनगर व इतर काही जातीचा समावेश करण्यात यावा, असे काही राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी सरकारवर धरणे आंदोलन करून दबाव आणत आहेत. आदिवासी समाजावर होणारा अन्याय आदिवासी बांधव कधीही सहन करणार नाही. महाराष्ट्र राज्यातील धनगर व इतर जातीचा आदिवासीच्या प्रथा, परंपरा रितीरीवाज व संस्कृतीशी कोणताही संबंध जुळत नाही. त्यांच्या व्यावसायीक जाती आहेत. खरे आदिवासी अजूनही अल्पशिक्षित, राजकारणाने दुबळे, बेरोजगार व नक्षलग्रस्त समस्यांने वेढलेले असल्याने धनगर व इतर जाती आदिवासीच्या नोकऱ्या सोयी सवलती व राजकीय पद बळकावण्यासाठीच आदिवासीच्या अनु.जमाती प्रवर्गात सहभागी होण्याचा षडयंत्र करीत आहेत.या विरोधात महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र शासनाने व केंद्र सरकारने धनगर व इतर जातींना अनु.जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये व खऱ्या आदिवासींच्या अस्मीतेचे व आरक्षणाचे रक्षण करावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संजय धुर्वे, जगन धुर्वे, दुर्गेश कळपती, नरेश धुर्वे, गोपालसिंह उईके, फुलचंद सिडामे, अनसूया इळपाते, मुन्ना सलाम, सुरेश कुंभरे, राकेश पंधरे, नितीन उईके, आनंद मरस्कोल्हे, यशवंतराव परतेती, हरिचंद टेकाम, राधेशाम किरसान, वसंत टेकाम, बेनीलाल पंधरे, घनशाम मरस्कोल्हे, बी.डी. कुरसुंगे, टी.एम. मडावी, झामसिंग भोयर, एस.जी. इळवाते आदी समाजबांधव व पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)