शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

विनापरवाना वाहन चालवू नका

By admin | Updated: September 5, 2015 02:25 IST

विनापरवाना वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वाहन चालविणारा व्यक्ती हा अपघातास कारणीभूत राहतो.

पी.बी. भोसले : खमारी येथे कायदेविषयक शिबिरगोंदिया : विनापरवाना वाहन चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. विनापरवाना वाहन चालविणारा व्यक्ती हा अपघातास कारणीभूत राहतो. त्यामुळे प्रत्येकाने परवाना काढून वाहन चालवावे, असे मत न्यायमूर्ती पी.बी. भोसले यांनी व्यक्त केले.जवळील ग्राम खमारी येथील श्रीराम विद्यालय व आर.एस.डोये कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने गुरूवारी आयोजित कायदेविषयक साक्षरता शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी न्या.पी. एच. खरवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील बिना बाजपेई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.टी.बी. कटरे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस उपनिरीक्षक दादाराजे पवार उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी, पालकांनी आपल्या पाल्यांचा विचार करुन १८ वर्ष पूर्ण झाल्यावर परवाना काढून वाहन चालविण्यास द्यावे. अपघातामुळे होणारे दुष्परिणाम पाल्यांच्या लक्षात आणून द्यावे. त्यामुळे पाल्य सुद्धा जबाबदारीने वाहन चालवतील. रॅगिंगचे दुष्परिणाम पटवून देऊन मुलांनी व्यसनापासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. अध्यक्षस्थानावरुन बोलताना न्या. खरवडे यांनी, १८ वर्षाखालील बालकांना मोफत विधी सहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तालुकास्तरावर तालुका विधी सेवा समित्यांकडे मदत मागावी असे सांगितले.अ‍ॅड. बाजपेई यांनी बेटी बचाओ, बेटी बढाओ, अ‍ॅड.कटरे यांनी शिक्षणाचा अधिकार, पोलीस अधिकारी न्यायदे यांनी बालकांसाठी विशेष बाल पोलीस पथक याबाबतची माहिती दिली. या कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाला इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये अनेक विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन अ‍ॅड. धोटे यांनी केले. आभार प्राचार्य मार्कंडेय यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे के.टी. कढव, एम.पी. पटले, के.एस. पिल्लेवान, शिवदास थोरात, विद्यालयाचे पर्यवेक्षक बी.जे. रावते, यु.आय. चौधरी, आर.एस. डोये यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)