शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्तांची यादी तातडीने करा

By admin | Updated: March 4, 2015 01:18 IST

तिरोडा तालुक्यात पावसाने थैमान घातले. २४ तासात तालुक्यात ११० मिमी

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : आमदारांसह केली परसवाडा परिसरात पाहणीपरसवाडा : तिरोडा तालुक्यात पावसाने थैमान घातले. २४ तासात तालुक्यात ११० मिमी व परसवाडा महसुली मंडळात ११७ मिमी पावसाची नोंद झाली. अकाली पावसाने चना, लाखोरी, जवस, गहू, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अमित सैनी व इतर अधिकाऱ्यांनी यावेळी पाहणी करून नुकसानीचा अंदाज घेतला. चार दिवसात नुकसानग्रस्तांची यादी तयार करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.मुंडीकोटा १३० मिमी, ठाणेगाव ९५ मिमी, वडेगाव ९० मिमी, परसवाडा ११७ मिमी याप्रमाणे तालुक्यात चारही महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. मुंडीकोटा परिसरात घाटकुरोडा, चांदोरी, बिरोली, घोघरा, मांडवी, करटी खुर्द, पुजारीटोला, मरारटोला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपालाचे पिक घेतले जात. सर्व पिक भुईसपाट पाण्यात बुडाले आहेत. परसवाडा परिसरात हरभरा, लाखोरी, जवस, गहू पिकांचे संपूर्ण नुकसान झाले. तालुक्यात १२५ महसुली गावे असून हरभरा सर्वसाधारण क्षेत्र ९१० हेक्टर असून बागायती हरभरा ४६० हेक्टर, कोरडवाहू ४९७, गहू सर्वसाधारण क्षेत्र ४०० हेक्टर यात बागायती २१४, कोरडवाहू १९३ हेक्टर, जवस सर्वसाधारण क्षेत्र १३१७ हेक्टर, कोरडवाहू फोकीव ७९७ हेक्टर, पेरीव ५.५० हेक्टर, लाखोरी ३५०० हेक्टर, भाजीपाला २४४ हेक्टर एकूण ६६८७ हेक्टरमध्ये सर्व पिकांची लागवड करण्यात आली होती. यात सर्वच पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. या सर्व पिकांची पाहणी परसवाडा क्षेत्रात करटी बु., बाघोली, परसवाडा येथे डॉ. योगेंद्र भगत यांच्या शेतातील परिसरातील हरभरा, जवस, लाखोरी, गहू व करटी बु. येथे भाजीपाला पिकांची पाहणी आ. विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे, जि.प. सदस्य डॉ. योगेंद्र भगत, उपविभागीय अधिकारी प्रविण महीरे, तहसीलदार शुभांगी आधंळे, खंडविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, ताकृअ पोटदुखे, कृषी अधिकारी चरडे, रमेश पटले, तलाठी हटवार, गेडाम, बारसे आदींनी केली. जिल्हाधिकारी यांनी चार दिवसात संपूर्ण नुकसानीची गावनिहाय यादी सर्वेक्षण करून पूर्ण करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी महिरे, तहसीलदार आंधळे यांना दिले. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीव्दारे माहिती दिली. आर्थिक मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)