दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : दिवाळी हा प्रकाश पर्वाचा सण, मात्र समाजात अनेक घटक असे आहेत ज्यांची दिवाळी अंधकारमय असते. अशा खितपत पडलेल्या अंधकारात चाचपडत राहिलेल्या चिमुकल्यांना उजाळा देण्यासाठी तो स्वत:च्या मानधनातून चिमुकल्यांसह दिवाळी साजरी करतो.समाजात प्रकाश टाकणाऱ्या आणि चिमुकल्यांच्या निरागस चेहºयावर आनंदाचे क्षण देणाºया त्या दानशूर व्यक्तीचे नाव आहे आशिष बारेवार. ते गोरेगाव नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदावर आरुढ आहेत.समाजाविषयी, अवतीभवती वावरणाºया लोकांविषयी आसक्ती असली की अनेक अभिनव उपक्रम मृर्तरुप घेतात. असाच एक आगळावेगळा अभिनव उपक्रम नगराध्यक्ष बारेवार यांनी राबविला. स्वत:च्या मानधनातील बारा हजार रुपयातून चंद्रपूरटोली येथील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली.आपल्या देशाला सणसमारंभाची धार्मिक व प्राचीन परंपरा आहे. गुढीपाडव्यापासून मराठी महिन्यांचा शुभारंभ होतो. मराठी माणसं वर्षभर कुठल्या ना कुठल्या देवी-देवतांची मनोभावे आळवणी करतात. सणांचा सर्वात मोठा आनंदोत्सव दिवाळीचा असतो. लख-लख दिव्यांच्या प्रकाशाने पृथ्वीवरीलच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील अंधकाराचा नायनाट करणारा सण अशी प्रचिती आहे. पण या प्रकाश पर्वातील अनेकांचे काळोखातील जीने सुरुच आहे. त्यावर मात म्हणून बारेवार यांनी गेल्या पाच वर्षापासून एका अभिनव उपक्रमाला हात घातला आहे. चंद्रपूरटोली येथील चारशे कुटुंबातील चिमुकल्यांना फटाके आणि मिठाई वाटून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. दरवर्षी चंद्रपूरटोली येथील निरागस बालके दिवाळीच्या पूर्वसंध्येला बारेवार यांची वाट पाहत एका जागेवर जमा होतात.बारेवार आपल्या मित्रांसोबत जाऊन त्या चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करतात.या अभिनव उपक्रमाला नगराध्यक्ष आशिष बारेवार, विकास बारेवार, नितीन बारेवार, अनिल राऊत, मोरेश्वर कांबळे, नमन जैन, अमोल भेंडारकर, संजय घासले, भानू हरिणखेडे, शुभम रामटेके, अश्विन रुखमोडे, नितीन कांबळे, अरुण ठाकरे, भालचंद्रत चाचेरे, मलेवार, यश कुण्डजवार, साकेश पालेवार, प्रतिक फाये, टिटू जैन, तरुण पाटील, करण जैन, राजेश सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते.प्लास्टीक बंदीची अंमलबजावणीचारशे चिमुकल्यांना फटाके व मिठाई देताना कुठेही प्लास्टीकचा वापर न करता कागदी थैलीत सर्व काही दिले जाते. प्लास्टीकच्या वापरावर असलेली शासकीय बंदीचे पालन चिमुकल्यांकडून करविले जाते, असे आशिष बारेवार यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.
मानधनाच्या पैशातून चिमुकल्यांसोबत दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST
समाजात प्रकाश टाकणाऱ्या आणि चिमुकल्यांच्या निरागस चेहºयावर आनंदाचे क्षण देणाºया त्या दानशूर व्यक्तीचे नाव आहे आशिष बारेवार. ते गोरेगाव नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदावर आरुढ आहेत. समाजाविषयी, अवतीभवती वावरणाºया लोकांविषयी आसक्ती असली की अनेक अभिनव उपक्रम मृर्तरुप घेतात. असाच एक आगळावेगळा अभिनव उपक्रम नगराध्यक्ष बारेवार यांनी राबविला. स्वत:च्या मानधनातील बारा हजार रुपयातून चंद्रपूरटोली येथील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली.
मानधनाच्या पैशातून चिमुकल्यांसोबत दिवाळी
ठळक मुद्देअभिनव उपक्रम : निरागस चेहरे झाले प्रफुल्लीत,मदतीचा हात