शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

दिव्यांग हा समाजाचा घटक आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:40 IST

दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्युनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : दिव्यांगांना साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : दिव्यांग हा समाजाचा घटक आहे. त्यांचा सन्मान व चांगली वागणूक देणे हे प्रत्येकांचे कर्तव्य आहे. सन्मानपूर्वक वागणुकीमुळे त्यांच्यातील न्युनगंड संपुष्टात येऊन त्यांना प्रेरणा मिळते,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटयार्डमध्ये आयोजित दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क सहाय्यक उपकरणे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी गोंदिया परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पं.स.सभापती अरविंद शिवणकर, कृउबा समितीचे सभापती काशिम जमा कुरेशी, उपसभापती लायकराम भेंडारकर, पं.स.च्या उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.च्या माजी उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपचे तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, जि.प. सदस्य कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाणे, रघूनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, केवलराम पुस्तोडे, चामेश्वर गहाणे, होमराज ठाकरे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे, समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके, उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाळे उपस्थित होते.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याचा महाराष्टÑ शासनाचा पहिला महत्वकांक्षी प्रकल्पाची गोंदियातून सुरुवात झाली आहे.हा प्रकल्प राज्यभर राबविला जाणार आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात उपकरणे वितरण शिबिर आयोजित केले असून याद्वारे २३०० दिव्यांगांना तीन चाकी सायकल, कुबडी, श्रवणयंत्र, काठी, स्मार्टफोन यासारखी उपकरणे मोफत दिली जात आहेत.यासाठी १ कोटी ७२ लक्ष रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. शासनातर्फे १३ दिव्यांग खेळाडूंना नोकरी देण्यात आली. यासारख्या त्यांच्या हिताच्या विविध योजना शासन राबवित आहे. शिक्षण हा महत्वाचा घटक आहे. या क्षेत्रात इमारती, वर्गखोल्या, शिक्षकांची उणीव आहे. शिक्षक मुख्यालयात राहात नाही. अशा अनेक तक्रारी आहेत.साथीचे आजाराची लागण या दिवसात होते. दिवयांगांचे शिक्षक आपले कर्तव्य चोख बजावत आहेत किंवा नाही. याविषयी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. अनेक शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत. याकडे महसूल व सहकार विभागाने लक्ष द्यावे. वनजमिनीवरील अतिक्रमणाचे पट्टे देण्याचे निर्देश देवून ८ दिवसात हे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन रत्नाकर बोरकर, प्रास्ताविक मिलिंद रामटेके यांनी केले. खंडविकास अधिकारी एन.आर.जमईवार यांनी मानले.अनुदान राशी ५ टक्केग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, महानगर पालिका, नगर पालिका, नगर पंचायती यासारख्या विविध कार्यालयांना शासनाकडून मिळणाºया निधीपैकी ३ टक्के खर्च दिव्यांगांसाठी केला जात होता. यापुढे ५ टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च केला जाणार आहे.