लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेंतर्गत २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. अमरावती येथील डॉक्टरांनी हे निर्बिजीकरण केले. मोहिमेचा हा पहिला टप्पा असून पुन्हा मोहीम राबविल्यानंतर शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या आटोक्यात येणार.शहरात आजघडीला प्रत्येकच भागात मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कित्येक भागात तर रात्रीला लोकांना ये-जा करताना कुत्रे मागे धावत असल्याने त्रास होऊ लागला आहे. शिवाय मध्यंतरी पिसाळलेल्या कुत्र्याने कित्येकांना चावा घेतल्याचे प्रकारही शहरात घडले आहेत. मोकाट कुत्र्यांची ही वाढती संख्या शहरवासी व नगर परिषदेसाठी डोकदुखीची ठरत होती. यावर तोडगा काढण्यासाठी व शहरवासियांची ही समस्या लक्षात घेत नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी २७ आॅक्टोबर २०१७ ला घेतलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शहरातील बेवारस कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रस्ताव मांडला होता.गंभीर विषय असल्याने या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी मिळाली होती. त्यानुसार, अमरावती येथील लक्ष्मी एनीमल वेलफेयर या डॉ. अरविंद उडाखे यांच्या संस्थेला कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम देण्यात आले. डॉ. उडाखे यांनी २६ आॅक्टोबरपासून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम सुरू केले. त्यांना शहरातील २ कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे टार्गेट देण्यात आले होते. त्यानुसार, १७ जानेवारीपर्यंत त्यांनी दिलेल्या टार्गेटची पूर्तता केली आहे. विशेष म्हणजे, शहरातील लोकसंख्येच्या आधारावर कुत्र्यांची संख्या ठरविण्याचे समिकरण असून त्यानुसार शहरात जवळपास ८ हजार कुत्रे असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यातील २५ टक्के म्हणजेच २ हजार कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे टार्गेट यंदा घेण्यात आले होते.पहिल्या टप्प्यात या २ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून आता पुढे टप्प्या-टप्प्याने ही मोहीम राबविल्यास शहरातील मोकाट कुत्र्यांची समस्या मार्गी लागणार आहे.कुत्रे पक डण्यासाठी आसामचे पथकडॉ.उडाखे यांनी कु त्रे पक डण्यासाठी आसाम येथील ४-५ मुलांचे पथक गोंदियात आणले होते. हे पथक कुत्र्यांना पकडत होते. त्यावर डॉ. उडाखे शस्त्रक्रिया करीत होते. शस्त्रक्रिया झाल्यावर २४ तास त्यांच्यावर निगरानी व औषधोपचार करून त्यानंतर कुत्र्यांना सोडले जात होते.
शहरातील २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 21:51 IST
शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेंतर्गत २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. अमरावती येथील डॉक्टरांनी हे निर्बिजीकरण केले. मोहिमेचा हा पहिला टप्पा असून पुन्हा मोहीम राबविल्यानंतर शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या आटोक्यात येणार.
शहरातील २ हजार कु त्र्यांचे निर्बिजीकरण
ठळक मुद्देमोहिमेचा पहिला टप्पा : शहरात सुमारे ८ हजार कुत्र्यांचा अंदाज