शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शेंडा परिसराला बसला. जवळपास अर्धा पाऊस आणि गारपिट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गारांचा खच पडला होता.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : घरांची पडझड, लोहारा परिसरात घरांचे छत उडाले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने जिल्ह्यात ६ ते १० मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. शुक्रवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास गोंदिया शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर दुपारच्या सुमारास सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा, सालेकसा, आमगाव या भागात सुध्दा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बी पिकांच्या नुकसानीत वाढ होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उत्त्पन्न हाती येण्याची शक्यता कमी आहे.गारपिटीचा पिकांना फटकासडक अर्जुनी : तालुक्यात शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा शेंडा परिसराला बसला. जवळपास अर्धा पाऊस आणि गारपिट झाल्याने रस्त्यावर आणि शेतांमध्ये गारांचा खच पडला होता. डव्वा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात गारांचा खच पडला होता. अवकाळी आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला. यामुळे शेतकºयांना गहू, हरभरा या पिकांपासून मुकण्याची वेळ आली आहे.गोरेगाव परिसरात अर्धातास जोरदार पाऊसगोरेगाव : गोरेगावसह तालुक्यातील इतर भागात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. तर काही भागात गारपीट सुध्दा झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास अर्धातास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याचे चित्र होते. तर वादळी पावसामुळे शेतातील गहू आणि हरभरा ही पिके पूर्णपणे मातीमोल झाल्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे.सालेकसा परिसराला वादळाचा तडाखासालेकसा : सालेकसा तालुक्यातील लोहारा, सोनपुरी, कावराबांध या गावाना वादळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला.त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.लोहारा परिसरात घराचे छत उडालेलोहारा : देवरी तालुक्यातील लोहारा परिसराला शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच फटका बसला. वादळी वाºयामुळे लोहारा येथील अनेक नागरिकांच्या घराचे छत उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर वादळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला.आमगाव व तिरोड्यात पावसाची हजेरीआमगाव : आमगाव आणि तिरोडा तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. अवकाळी पावसामुळे शेतातील बांध्यामध्ये पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस