शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘वाचन-आनंदा’त जिल्हा दंग

By admin | Updated: September 9, 2016 01:54 IST

जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये गुरूवारी दप्तरविरहीत दिन ‘वाचन आनंद दिन’ म्हणून पाळण्यात आला.

राज्यासाठी दिशादर्शक : दप्तर न आणता विविध पुस्तकांचे केले वाचनगोंदिया : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये गुरूवारी दप्तरविरहीत दिन ‘वाचन आनंद दिन’ म्हणून पाळण्यात आला. १६८४ शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सर्व विद्यार्थी विविध प्रकारची पुस्तकेच वाचन्यात दंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले. संपूर्ण राज्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरला. विशेष म्हणजे विद्यार्थी व शिक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी आमगाव तालुक्याच्या पदमपूर जि.प. शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांंना दररोजच्या दप्तराच्या ओझ्यापासून एक दिवसासाठी का असेना, दिलासा मिळाल्याने त्याचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये दिसत होता.विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी गोंदिया जिल्हा परिषदेने अनेक वेळा वाचन दिवस, वाचन कट्टा तयार केला. अक्षर सुधारण्यासाठी अक्षर सुधार कार्यक्रम घेतले. पुन्हा एकदा गोंदिया शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वर्ग १ ते १२ वी च्या शाळांत वाचन आनंददिन साजरा केला आहे. या प्रेरणेतून अख्या महाराष्ट्रात १५ आॅक्टोंबरला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे ठरविले. राज्यातील २ कोटी विद्यार्थी अवांतर पुस्तकाचे वाचन करणार आहेत. मुक्त वातावरणात संचरणाऱ्या विद्यार्थ्यांनी मौज करीत वाचन आनंद दिवसाचा फायदा घेत विविध जवषयाची पुस्तके हाताळली. तज्ज्ञ अजधकाऱ्यांचे मार्गदर्शनही त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले. बड्या अधिकाऱ्यांनी आपण जि.प. च्या शाळातून कसे घडलो याची माहिती विन्यार्थ्यांना दिली. आमगाव तालुक्याच्या पदमपूर येथे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, त्यांचे वडील नामदेवराव सुर्यवंशी, आई सुशीला सुर्यवंशी, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पं.स. सदस्य जयप्रकाश शिवणकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी खुमेंद्र बोपचे, मुख्याध्यापक शरद पुल्लरवार व शिक्षक उपस्थित होते. प्रत्येक शाळेत अधिकारी व पदाधिकारी उपस्थित झाले होते. शैक्षणिक वाचनाचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला.तालुका व जिल्हास्तरावर पर्यवेक्षीय यंत्रणेशी संपर्क करण्याकरिता व कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी होईल याची खात्री करण्याकरीता नोडेल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)