शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला अकाली पावसाने झोपडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 21:02 IST

रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे.

ठळक मुद्देकाही तालुक्यांत जोरदार पाऊस : जिल्हयात २८४.२ मीमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रविवारी पहाटे अचानकच जिल्ह्यात पाऊस बसरला असून या अवकाळीने जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे काही नुकसान झाले नसले तरीही रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरला आहे. जिल्ह्यात २८४.२ मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.शनिवारी (दि.२) पावसाचा अंदाजही दिसत नसताना रविवारी (दि.३) पहाटे मात्र पावसाने हजेरी लावली.गोंदिया, देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यात दमदार पाऊस बरसला आहे. तर अन्यत्र साधारण पाऊस बरसल्याची माहिती आहे. या पावसामुळे जिल्ह्यात मालमत्ता किंवा जिवीतहानी झालेली नाही. मात्र शेतात असलेल्या चना, गहू व अन्य पिकांना या पावसाचा फटका बसणार असल्याचे समजते.यंदा उन्हाळी धान पिकासाठी जलाशयांचे पाणी न मिळाल्याने कित्येक शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस, लाखोळी, उडीद, राई, वटाणा आदि रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र दर महिन्यातच पाऊस हजेरी लावत असल्याने पिकांचे नुकसान होत राहिले. मागील महिन्यातील पावसानेही पिकांची नासाडी केली. आताच्या पावसाने हरभराला फटका बसला आहे. शिवाय आंब्याचा मोहरही मोठ्या प्रमाणात झडल्याने आंबा उत्पादनवरही परिणाम पडणार आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांनी भरपाईची मागणी केली आहे.विशेष म्हणजे, रविवारी जिल्ह्यात २८४.२ मीमी. पावसाची नोंद करण्यात आली असून त्याची ८.६ एवढी सरासरी आहे.यात गोंदिया तालुक्यात सर्वाधीक ८२ मीमी पाऊस बरसल्याची नोंद आहे. तर सर्वात कमी पाऊस गोरेगाव तालुक्यात बरसला असून १८.२ एवढी नोंद घेण्यात आली आहे. शिवाय अर्जुनी-मोरगाव तालुक्यात पावसाची नोंद घेण्यात आलेली नाही.गोठ्याचे छत उडालेरविवारी आलेल्या वादळी वारा व पावसामुळे आमगाव तालुक्यातील ग्राम भालीटोला येथील शेतकरी श्रीराम लाडकू यांच्या गोठ्यातील लोखंडी छत उडाले. यात त्यांचे २ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :Rainपाऊस