शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसेच !

By admin | Updated: June 23, 2014 23:56 IST

जिल्ह्याचे माहिती अधिकारी कोण असा सवाल केल्यास माहिती असलेला व्यक्ती पटकन पल्लवी धारव यांचे नाव घेणार. मात्र त्यांच्या कार्यालयात जाऊन बघितल्यास माहिती फलकात आजही तत्कालीन

कार्यालयाचे फलक अपडेट नाही : धारव मॅडम रुजू होऊन तीन महिने झालेगोंदिया : जिल्ह्याचे माहिती अधिकारी कोण असा सवाल केल्यास माहिती असलेला व्यक्ती पटकन पल्लवी धारव यांचे नाव घेणार. मात्र त्यांच्या कार्यालयात जाऊन बघितल्यास माहिती फलकात आजही तत्कालीन माहिती अधिकारी विवेक खडसे यांचेच नाव दिसून येते. धारव मॅडम यांना पदभार घेऊन तीन महिने होत असले तरी त्यांच्या कार्यालयातील माहिती फलक अद्याप अपडेट झालेले नाही. यामुळे जिल्ह्यातील अपडेटेड माहितीचे केंद्र असलेले माहिती कार्यालय स्वत:च अपडेट नसल्याचे यातून दिसून येते. जिल्ह्यातील विविध शाखांची माहिती प्राप्त करावयाची असल्यास जिल्हा माहिती कार्यालय उपयुक्त स्थान आहे. सर्वसामान्यांना तर सोडाच मात्र वृत्तपत्रांना सुद्धा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून कित्येक माहिती पुरविली जाते. एवढेच नव्हे तर शासकीय कार्यालयातील बहुतांश माहितीचे व्यवहार सुद्धा माहिती कार्यालयाच्या माध्यमातूनच केले जातात. यावरून शासन व सर्वसामान्यांसह प्रामुख्याने वृत्तपत्रांमधील दुवा म्हणजे माहिती कार्यालय असे बोलणे वावगे ठरणार नाही. यामुळे विविध विषयांची अपडेटेड माहिती ठेवणे माहिती कार्यालयाचे काम आहे. मात्र आपल्या कार्यालयातील अंतर्गत विषयांना घेऊनच येथील माहिती कार्यालय अपडेट नसल्याचे दिसून येते. त्याचे असे की, एखादा नवखा कार्यालयात गेल्यास व तेथे लागलेले फलक बघितल्यास त्याला माहिती अधिकारी विवेक खडसेच असल्याची माहिती मिळणार. कारण, कार्यालयात लागलेल्या माहिती फलकात आजही माहिती अधिकारी म्हणून विवेक खडसे यांच्या नावाची नोंद असून त्यांनी पदभार घेतलेल्या तारखीची नोंद आहे. वास्तवीक मात्र खडसे यांचे स्थानांतरण होऊन आता वर्ष होत आहे. त्यांच्या नंतर मनिषा सावळे यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचा प्रभार देण्यात आला होता. आजघडीला पल्लवी धारव या माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धारव मॅडम मार्च मध्ये रुजू झाल्या असून आता तीन महिने होत असली तरी त्यांनीही हे फलक अपडेट करवून घेतले नाही. वास्तवीक हे त्यांचे काम नाही मात्र संबंधीत कर्मचाऱ्याने तरी हे काम करवून घेणे अपेक्षीत आहे. मात्र तसे न झाल्याने माहिती फलकानुसार जिल्हा माहिती अधिकारी खडसेच आहेत. (शहर प्रतिनिधी)