शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वाढले दीड लाख मतदार

By admin | Updated: August 28, 2014 23:52 IST

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने आपली तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी

विधानसभा निवडणूक : प्रशासकीय यंत्रणा लागली कामालागोंदिया : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने आपली तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी यांनी गुरूवारी आदर्श आचारसंहितेची आणि पेड न्यूज संदर्भातील माहिती देणारी संयुक्त कार्यशाळा घेऊन शासकीय नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन केले. दरम्यान २००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी जिल्हाभरात दिड लाख मतदार वाढले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.या कार्यशाळेला जिल्हाधिकाऱ्यांसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के. लोणकर, गोंदिया मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, तिरोडा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे, अर्जुनी मोरगाव मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिलीप मनकवडे, आमगाव क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा देवरीचे उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे यांच्यासह सर्व तहसीलदार, सर्व विभागांचे जिल्हा प्रमुख, सर्व मतदार संघातील सहायक निवडणूक निरीक्षक (खर्च), तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या चारही विधानसभा मतदार संघांमध्ये २००९ च्या निवडणुकीच्या वेळी एकूण ८ लाख ७० हजार २७२ मतदार होते. यावेळी त्यात १ लाख ४८ हजार २९६ मतदारांची भर पडल्याने मतदारांची एकूण संख्या १० लाख १८ हजार ५६८ झाली आहे.चारही विधानसभा मतदार संघांबाबतची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर यांनी यावेळी दिली. अर्जुनी मोरगाव मतदार संघात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. तिरोडा मतदार संघात तिरोडा, गोरेगाव आणि गोंदिया मतदार संघाचा काही भाग समाविष्ठ होतो. आमगाव मतदार संघात आमगाव, देवरी आणि सालेकसा हे तीन तालुके तर गोंदिया मतदार संघात केवळ गोंदिया तालुक्याचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)