शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले.

ठळक मुद्देरब्बी पिकांचे नुकसान : उत्पादन घटणार,वातावरणातील बदलाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पांढरी, नवेगावबांध, सडक अर्जुनी आणि गोंदिया तालुक्याला बसला. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मूंग, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.हवामान विभागाने जिल्ह्यात १७ ते २१ मार्च दरम्यान जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध, केशोरी, गोठणगाव या परिसरात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकासह मिरची आणि टरबुजाच्या वाड्यांचे सुध्दा नुकसान झाले. मागील पंधरा दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने रब्बीतील गहू, हरभरा आणि भाजीपाल्याची पिके पूर्णपणे भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना हाती आलेली पिके गमाविण्याची वेळ आली आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात मिरची आणि टरबुजाच्या वाड्या मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी टरबुज आणि मिरची विदेशात सुध्दा पाठविली जाते. सध्या मिरचीचा पहिला तोडा सुरू असून शेतकºयांनी तोडणी केलेली मिरची वाळविण्यासाठी ठेवली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे वाळत घातलेली मिरची भिजल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर टरबुजाचे पीक सुध्दा निघण्याच्या मार्गावरुन असून त्याला सुध्दा गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. तर बुधवारी (दि.१८) सकाळच्या सुमारास गोंदिया शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.ढगाळ वातावरण आणि पावसामुळे रब्बीतील पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच हवामान विभागाने २१ मार्चपर्यंत पाऊस आणि गारपिटीचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.३५ हजार हेक्टरमधील पिके संकटातयंदा जिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक २५ हजार हेक्टर क्षेत्र धानाचे आहे. तर १० हजार हेक्टरवर गहू, हरभरा या पिकांची लागवड करण्यात आली आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका गहू आणि हरभरा या पिकांना बसला आहे. त्यातच मागील पंधरा दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असल्याने उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचितजिल्ह्यात आक्टोबर महिन्यात आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे सर्वेक्षण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. मात्र अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस