शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 21:47 IST

येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरून कर्मचाºयांना म्हसगाव येथील सरपंचांसह २०-२५ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली.

ठळक मुद्देकर्मचाºयांना मारहाण : म्हसगाववासीयांनी घातला गोंधळ

कर्मचाºयांना मारहाण : म्हसगाववासीयांनी घातला गोंधळलोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात शिरून कर्मचाºयांना म्हसगाव येथील सरपंचांसह २०-२५ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रावरुन ६५ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. यामुळे अनेक वेळा तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडित होतो. यामध्ये गोरेगाव, मुंडीपार, कटंगी, मिलटोला चार फिडर असून मुंडीपार फिडरमध्ये सर्वाधिक २५ गावांचा समावेश आहे. या फिडरमध्ये बिघाड आल्याने शनिवारी (दि.१२) रात्री ८.३० वाजता वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती मिळताच अभियंता डी.सी. बिसेन यांनी कर्मचाºयांना फिल्डवर पाठवून फॉल्ट काढून लाईन दुरुस्ती करण्यास सांगितले.लाईन दुरुस्तीचे काम उपकेंद्रात सुरु असतानाच म्हसगाव येथील सरपंच एकराम बुरडे, बाबा रहांगडाले यांच्यासह २० ते २५ लोकांनी उपकेंद्रात येऊन कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांसोबत बाचाबाची व मारहाण करून सामानाची तोडफोड केली.तसेच म्हसगावचा पुरवठा बंद असल्यामुळे गोरेगावचाही पुरवठा बंद करण्याची धमकी देवून ग्रीप काढून फेकल्या व गोेरेगावचा चालू पुरवठा खंडीत केला.यावेळी लाइनमेन के.टी. लांजेवार, एफ. टी. कुरेशी, जी.एम. चव्हाण, एस.एस. निपाने व इतर कर्मचारी आपापले काम करीत असतानाच लांजेवार यांना खांबावरुन उतरवून गोरेगावची लाईन आधी बंद करा म्हणून ढकल ढूकल करुन मारहाण करण्यात आली. या प्रकरणामुळे कर्मचाºयांत दहशतीचे वातावरण असून असे प्रकार घडू नये यासाठी कर्मचाºयांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी कर्मचाºयांनी केली आहे.सरपंचांसह ३० जणांवर गुन्हा दाखलशनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत वरिष्ठ तंत्रज्ञ रविंद्र ठमठेरे यांच्या तक्रारीवरून म्हसगावचे सरपंच बुरडे (४२), मुन्ना कावडे (३८), बाबा रहांगडाले (४३), प्रवीण रहांगडाले (३०), देवेंद्र रहांगडाले (४३) व इतर २५ अशा एकूण ३० जणांवर गोरेगाव पोलिसांत भादंवीच्या कलम ३५३, ५०४,५०६,१४३,१४७,१४९, १८६ अंतर्गत गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.