शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: May 18, 2015 00:48 IST

१ जूनपासून पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रयत्नसुद्धा करण्यात आले नाहीत.

गोंदिया : १ जूनपासून पाऊस सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र आतापर्यंत आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रयत्नसुद्धा करण्यात आले नाहीत. यावर्षी वेळेवर आपत्ती व्यवस्थापन करण्यात येईल किंवा नाही, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाची कार्यप्रणाली पाहून उपस्थित केला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, ५ मे रोजी आपत्ती व्यवस्थापनाची एक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यात १ जूनपासून कंट्रोल रूम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाघ-इटियाडोह विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले की, त्यांनी पूर नियंत्रण कामात तत्पर रहावे. एवढेच नव्हे तर विविध जलाशयांवर कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जर पुरामुळे पुलावरील रस्ते बंद पडले तर याची माहिती कंट्रोल रूमपर्यंत पोहोचविण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आले आहेत. मात्र हे सर्व प्रारंभीकरीत्या करण्यात आले.आपत्ती व्यवस्थापनाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी दूसऱ्या सभेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. परंतु ही दूसरी सभा केव्हा होईल, याबाबत कोणताही अधिकारी काहीही सांगण्यासाठी तयार नाही. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याशी विचारपूस केल्यावर ते काही सांगण्यास तयार झाले नाही. दूसऱ्या सभेत अनेक जिल्ह्यांचे प्रशासकीय अधिकारी, पूर व्यवस्थापनाशी निगडीत अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित राहतात. गोंदिया जिल्ह्याच्या शेजारी मध्यप्रदेशातील बालाघाट, छत्तीसगडमधील राजनांदगाव, राज्यातील गडचिरोली व भंडारा आदी भागांचा संबंध येतो. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या जिल्ह्यांसह ताळमेळ स्थापित करणे आवश्यक असते. परंतु आतापर्यंत सदर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांच्या संयुक्त सभेचे आयोजन करण्यात आले नाही. अशा सभेत आपत्ती व्यवस्थापनावर ठोस निर्णय घेतला जातो. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सदर सभेच्या आयोजनाबाबत कसलेही निर्णय घेण्यात आले नाही. विभागीय आयुक्त कार्यालयात पूर व्यवस्थापन संदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांची बैठक होते. यानंतरच जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन बैठकीचे आयोजन केले जाते. आयुक्त कार्यालयातच आतापर्यंत बैठक झाली नाही. अशात जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीबाबत काय सांगावे? असे एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)