शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

रूग्णालयाला घाणीचा विळखा

By admin | Updated: August 15, 2016 00:16 IST

येथील बाई गंगाबाई रूग्णालयाला लागलेला घाणीचा विळखा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे.

  1. ढिगार करते स्वागत : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
  2. गोंदिया : येथील बाई गंगाबाई रूग्णालयाला लागलेला घाणीचा विळखा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. प्रवेशव्दारापासूनच येथे घाण साचली असून अशाच वातावरणात येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांना वावरावे लागत आहे. हे रूग्णालयच आजारांचे ठिकाण उत्पादक बनले असून येथे वावरणाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही.

महिला व चिमुकल्यांसाठीची सोय येथील बाई गंगाबाई रूग्णालयात करण्यात आली आहे. आजघडीला रूग्णालयाचे मुख्य द्वार सिव्हील लाईन्स परिसरातून आहे. मात्र हे रूग्णालयाचे मुख्य द्वार आजारांचे मुख्य द्वार बनले आहे. त्याचे कारण असे की, प्रवेशद्वाराच्या अवतीभवती कचऱ्याचे ढिगार लागून आहेत. रूग्णालयातील कचरा व रूग्णालयात वावरणारे येथेच काचरा टाकून मोकळे होतात. परिणामी येथील कचऱ्याची समस्या काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. रूग्णालयातील सफाईचे कंत्राट महावत यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून नियमीत सफाई केली जात असल्याचे दिसते. मात्र रूग्णालयातील कचरा ते रूग्णालयासमोर असलेल्या शासकीय क्वार्टसच्या मोकळ््या जागेत टाकतात. परिणामी येथे कचऱ्याची खाणच तयार झाली आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असून पावसामुळे ही घाण कुजून त्यातून दुर्गंध पसरत आहे. शिवाय रूग्णालयाच्या आतील नाल्याही सांडपाण्याने बरबटलेल्या आहेत. तर रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांकडूनही वापरण्यात आलेल्या पाण्याचे डबके रूग्णालयात दिसतात. यातून डासांचा प्रादुर्भाव होणार व त्यापासून आजार पसरणार यात शंका नाही. रूग्णालयात गर्भवती महिला व नवजात शिशु असतात हे विशेष.