शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग पूर्णपणे बरा होणारा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:56 IST

भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसंजय रेवतकर : विशेष मार्गदर्शन कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : भारतातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांना क्षयरोग जंतुचे संक्रमण झालेले आहे. त्यातील १० टक्के लोकांना त्यांच्या जीवनात क्षयरोगाची बाधा होत असते. तरी क्षयरोग होण्यापासून बचावर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देत सकस आहार व योग्य व्यायाम करुन स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे. क्षयरोग हा कितीही गंभीर व जिवघेणा आजार असला तरी रूग्णाने प्रामाणिकपणे औषधोपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याची माहिती संजय रेवतकर यांनी दिली.जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजीत क्षयरोग मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. अर्पित पालेवार होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश लोथे व रिजवाना शेख उपस्थित होते.डॉ. लोथे यांनी, क्षयरोग होण्याची कारणे, लक्षणे व क्षयरोगाचे निदान कसे करता येईल याविषयी माहिती दिली. रुग्णांनी अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर-टीबी, एक्सडीआर-टीबी अशी प्राणघातक टी.बी. होत असल्याचे सांगितले. म्हणून रुग्णांनी पूर्वी उपचार करावा व प्रत्येक रुग्णाला दरमहा ५०० रुपये देण्यात येत असल्याचे सांगितले.डॉ. पालेवार यांनी, क्षयरोगाची माहिती देत क्षयरोग शरीराच्या कोणत्याही भागाला होणारा आजार आहे. त्यात ८५ टक्के फुफूसाचा क्षयरोग व १५ टक्के फुप्फुसाव्यतिरिक्त क्षयरोग होत असल्याचे सांगितले. तसेच बचावात्मक उपाय व उपचारावर माहिती दिली. संचालन करून प्रास्ताविक शेख यांनी मांडले. आभार निलेश सांगोळकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी दृष्टी संस्था, ग्रामीण रुग्णालयातील रवी बघेल, अमित भिवसाने, मेश्राम, शेख यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स