शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

गोंदिया : सद्य:स्थितीत राज्यात पुराचा तडाखा सुरू असून, राज्यातील अनेक जिल्हे पूर प्रभावित आहेत. जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूरपरिस्थितीचा सामना ...

गोंदिया : सद्य:स्थितीत राज्यात पुराचा तडाखा सुरू असून, राज्यातील अनेक जिल्हे पूर प्रभावित आहेत. जिल्ह्यात मान्सून कालावधीत पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सक्षमपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची पाहणी मंगळवारी (दि.२७) केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे,

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, शोध व बचाव पथक प्रमुख किशोर टेंभुर्णे व पथकातील सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील ९६ गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरू झाला असून, जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेतला. पूरपरिस्थितीदरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी रबर, फायबर बोटी, लाइफ जाकीट, लाइफ बॉय, इमर्जन्सी लाइट, ओबीएम मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिव्हाइस, सर्चलाइट आदी साहित्यांचे निरीक्षण केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूरपरिस्थितीदरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाययोजना, जिल्हा नियंत्रण कक्षाचे संचालन, मानक कार्यपद्धती व

पूरपरिस्थितीदरम्यान संबंधित सर्व विभागांचे समन्वय इत्यादीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संपूर्ण माहिती घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.

....................

गोंदिया व तिरोडा तालुक्यावर लक्ष

जिल्ह्यात मागील वर्षी २०२० मध्ये ऑगस्ट महिन्यात गोंदिया व तिरोडा या दोन तालुक्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान पूरपरिस्थितीत जीवित व वित्तीय हानी, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे, घर, गोठे व जनावरे इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेली गावे व त्यातील खोलगट भागातील घरांमध्ये पुराच्या पाण्यामुळे होणारे नुकसान, तसेच शासनाकडून तत्काळ मदत देण्याकरिता बोटीची व मनुष्यबळाची पुरेशी व्यवस्था इत्यादीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विस्तृत माहिती घेतली.

..........

आंतरराज्य पूर नियंत्रण समितीची बैठक

राज्यात उद्‌भवलेली पूरपरिस्थिती लक्षात घेता विभागीय आयुक्त नागपूर व जबलपूर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रदेश राज्यातील जिल्हा शिवनी, छिंदवाडा, बालाघाट, तसेच महाराष्ट्र राज्यातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांची बैठक २७ जुलै रोजी घेण्यात आली. यात मध्यप्रदेश येथील संजय सरोवर येथून वैनगंगा नदीमार्फत सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे परिचालन करण्यासंबंधी, तसेच धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना व सर्वसंबंधित जिल्ह्यांचा एकमेकांशी समन्वय साधण्याकरिता महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यादरम्यान मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील धरण व नद्यांची सद्य:स्थिती व पूरपरिस्थितीदरम्यान संबंधित यंत्रणेला सुसज्ज ठेवण्यासंबंधी माहिती दिली.