शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बनगाव येथे घाणच घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:25 IST

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा बिरसी-फाटा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. ...

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात असुविधा

बिरसी-फाटा : तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन डोळे झाक करीत आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

‘झाडे जगवा’ उपक्रम कागदोपत्री

पांढरी : पांढरीसह माहुली व भुसारीटोला या गावांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम राबवून कंत्राटदाराने झाडांची लागवड केली. परंतु त्यांची जोपासना न केल्याने कित्येक झाले मेली असून, उर्वरित मरण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे झाडांचे संगोपन होत असल्याचे कागदोपत्री दाखवून बिलाची उचल होत असल्याची ओरड होत आहे. एकंदर ‘झाडे लावा-झाडे जगवा’ उपक्रम कागदोपत्री दिसत आहे. यामुळे पांढरी, माहुली व भुसारीटोला या गावांत कंत्राटदाराच्या माध्यमातून किती झाडे लावण्यात आली व किती झाडे जिवंत आहेत यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आठवडी बाजाराची प्रतीक्षा संपली

केशोरी : कोरोनाच्या महामारीने येथील आठवडी बाजार मार्च २०२० पासून बंद करण्यात आला होता. आता सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे येथील आठवडी बाजार पुन्हा सुरू झाला आहे. सुमारे आठ महिन्यांनंतर आठवडी बाजार सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आठवडी बाजार सुरू होताच पुन्हा येथील बाजारपेठेत वर्दळ दिसून आली.

झाडावर कलम करण्याचे प्रात्यक्षिक

सडक-अर्जुनी : कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्राम बाह्मणी येथे गुलाब, पेरू व आंब्याच्या झाडावर कलम करून लोकांना प्रात्यक्षिक करून दाखविले. वेगवेगळ्या पद्धतीने कलम कशाप्रकारे लावली जाते हे समजावून सांगत त्याचे फायदे व महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. यावेळी विद्यार्थी मोहित चव्हाण, विशाखा ठाकरे, विवेक गहाणे, भूपाली डोंगरवार, सरपंच सरिता तरोणे, पोलीसपाटील विकास तागडे, महानंद भोवते, मेघा भोवते, प्रदीप तागडे, मुनेंद्र भोवते व गावकरी उपस्थित होते.

कचरापेट्यांकडे दुर्लक्ष

बाह्मणी-खडकी : येथील ग्रामपंचायतस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा इतरत्र पडून राहू नये यासाठी चौकाचौकांत कचरापेटा बसविण्यात आल्या. मात्र या कचरापेट्यांची नियमित सफाई होत नसल्याने त्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. यावरून ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे किती दुर्लक्ष आहे हे दिसून येते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

शेतकऱ्यांना बारदाना रकमेची प्रतीक्षा

केशोरी : धान खरेदी करताना शेतकऱ्यांचा बारदाना वापरात आणला होता. परंतु त्या बारदान्याची किंमत शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नाही. बारदाना रक्कम त्वरित देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

विश्रामगृह तयार करण्याची मागणी

केशोरी : जिल्ह्यास्थळावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे. मात्र येथे विश्रामगृह नसल्याने या अधिकारी तसेच जनप्रतिनिधींना परतावे लागते. करिता येथे विश्रामगृह तयार करण्याची मागणी केली जात आहे.

ऑनलाइन खरेदीला आला जोर

गोंदिया : शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑनलाइन वस्तू खरेदीला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचत होत असल्याने नागरिक आता ऑनलाइन वस्तू खरेदी करीत आहेत. यामुळे मात्र स्थानिक व्यवसायी अडचणीत येत आहेत.

रानडुकरांचा हैदोस कोण थांबविणार

अर्जुनी-मोरगाव : या परिसरातील शेतकरी पिकासाठी राबराब राबून व दिवसरात्र काबाडकष्ट करून घाम गाळतात. मात्र रानडुक्कर शेतात शिरून पिकांची नासाडी करीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची मेहनत मातीत जात आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जंगलातील माकडांचा येरंडीत वास

बाराभाटी : जवळील ग्राम येरंडी-देवलगाव येथे मागील महिनाभरापासून जंगलातील माकडांचा शिरकाव झाला असून यामुळे गावकरी वैतागून गेले आहेत. माकडे गाव सोडत नसल्याने आता ही माकडे येरंडी-देवलगाव रहिवासी झाल्यासारखे वाटत आहे. मात्र माकड सामानाची व कवेलूंची नासधूस करीत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

कृत्रिम रेतन केंद्राची मागणी

दासगाव : परिसरातील ग्राम निलज, शिवनी (गात्रा), उमरी, माकडी, बेलटोला, गोंडीटोला, गर्रा येथील शेतकऱ्यांना जनावरे उपचारासाठी दासगाव येथे न्यावी लागतात. त्याकरिता ग्राम निलज येथे कृत्रिम रेतन केंद्राची मागणी करण्यात आली आहे.

ग्रंथालयांकडून असमान निधीचे प्रस्ताव मागविले

गोंदिया : केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातील कोलकाता स्थित राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानतर्फे शासकीय ग्रंथालयांसाठी असमान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसाहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यानुसार सन २०२०-२१ साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहे.