शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा... आठपैकी सहा तालुके झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्याची आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून आठपैकी सहा तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित ...

गोंदिया : जिल्ह्याची आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून आठपैकी सहा तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित दोन तालुक्यांत केवळ ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२७) ६७८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ५६२ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर १२५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १ नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१५ टक्के आहे. जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी या सहा तालुक्यांमध्ये सध्या एकही कोरोनाबाधित रुग्ण नसून हे तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. तर उर्वरित दोन तालुक्यांत केवळ ७ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसांत जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत २१५०९९ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १८९९८९ नमुने निगेटिव्ह आले. कोरोनाबाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यांतर्गत २२१८८४ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी २००७९३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४११८३ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी ४०४७५ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ७ कोरोना ॲक़्टिव्ह रुग्ण असून १२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.

..........

लसीकरणाची सहा लाखांच्या दिशेने वाटचाल

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता वेग आला आहे. १४० हून अधिक केंद्रांवरून सध्या लसीकरण मोहीम सुरू असून याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५६६८९१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ४४ वर आहे.