शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाड्याच्या घरात डिजिटल शाळेचा वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ असा संदेश देऊन प्रशासन जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील ग्राम भागी येथील नामांकित प्राथमिक शाळा व तेथील शिक्षक यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. परंतु वर्गखोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, हा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे. सध्या या शाळेत वर्ग १ ते ५ मध्ये एकूण १८२ विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रत्यक्ष वर्ग  अध्यापनाकरिता ४ वर्ग खोल्या उपलब्ध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : हल्ली खासगी शाळेचे बाजारीकरण झाले असताना तालुक्यात प्रथम क्रमांकावर असणाऱ्या ग्राम भागी येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेत पटसंख्या जास्त असून वर्ग खोल्या कमी आहेत. यामुळे मुलांना शिक्षण द्यायचे कसे? असा प्रश्न येथील शिक्षक व पालकांना पडला आहे. यातूनच आता भाड्याच्या घरात वर्ग घेण्याची पाळी आली आहे. यावर शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तत्काळ दोन वर्गखोल्यांची मागणी केली आहे.‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’ असा संदेश देऊन प्रशासन जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील ग्राम भागी येथील नामांकित प्राथमिक शाळा व तेथील शिक्षक यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. परंतु वर्गखोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे, हा प्रश्न शिक्षकांसमोर पडला आहे. सध्या या शाळेत वर्ग १ ते ५ मध्ये एकूण १८२ विद्यार्थी शिक्षण घेत असून प्रत्यक्ष वर्ग  अध्यापनाकरिता ४ वर्ग खोल्या उपलब्ध आहेत. यापैकी दोन वर्ग खोल्या मोठ्या दुरुस्तीची प्रतीक्षा करीत आहेत.सध्या इयत्ता तिसरीचा वर्ग शाळेशेजारील भाड्याच्या घरात घेतला जात आहे. तरी प्रत्यक्ष अध्यापनाकरिता दोन वर्गखोल्या कमी पडत आहेत. २६ मार्च रोजी शाळा व्यवस्थापन समितीने ठराव घेऊन दोन वर्गखोल्यांकरिता मुख्य  कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव सादर करून तत्काळ दोन वर्ग खोल्यांची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन वर्गखोल्या द्याव्यात अशी मागणी पालकांनीसुद्धा केली आहे. याकडे प्रशासन किती गंभीरतेने लक्ष  देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शाळेच्या स्टेजवर भरतो एक वर्ग- बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र अमृतकर तसेच त्यांचे शिक्षक सुमीत चौधरी व अमोल खंडाईत यांनी फार मेहनत घेऊन शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविला. पटसंख्येच्या बाबतीत जिल्ह्यात प्रथम क्रमांक या शाळेने मागील वर्षी पटकाविला. शाळेतील जास्त पटसंख्या व वर्गखोल्या कमी बघता शासनाने दोन वर्षांअगोदर एक वर्गखोली दिली होती. त्यातच शाळेच्या स्टेजवर पालकांच्या सहयोगातून पत्रे व टाईल्स लावण्यात आली. आज त्या स्टेजवर एक वर्ग लागत आहे. शाळेचा नावलौकिक बघता येणाऱ्या सत्रातही शाळेतील पटसंख्या वाढणार हे लक्षात शासनाने या शाळेकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :digitalडिजिटलSchoolशाळा