शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

आदिवासी, नक्षलग्रस्त भागात डिजीटल ई-लर्निंग स्कूल

By admin | Updated: March 2, 2016 02:13 IST

तालुका मुख्यालय देवरीपासून काही अंतरावर दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असलेले, पूर्णत: आदिवासी समाजाचे वास्तव्य असणारे जेठभावडा हे गाव आता चर्चेत आले आहे ...

जिल्हा परिषदेची शाळा : खासदारांनी केले आधुनिक उपकरणांचे उद्घाटनगोंदिया : तालुका मुख्यालय देवरीपासून काही अंतरावर दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असलेले, पूर्णत: आदिवासी समाजाचे वास्तव्य असणारे जेठभावडा हे गाव आता चर्चेत आले आहे ते येथील शाळेमुळे. एखाद्या शहरी भागातील आधुनिक सुविधायुक्त शाळेला लाजवेल असा तामझाम या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा आहे. दुर्गम भागात असणाऱ्या शाळांमध्ये पहिली डिजीटल शाळा होण्याचा बहुमान या शाळेने पटकावला आहे.ज्या गावाला जाण्यासाठी बसची अथवा इतर कोणत्याही साधनाची सोय नाही, त्या गावची शाळा आज ई-लर्निंग स्कूल म्हणजेच पूर्णत: आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानयुक्त (डिजीटल) शाळा झाली आहे. सोमवारी (दि. २८) ला या शाळेतील डिजीटलायझेशनचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते, जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, आ.संजय पुराम, प्रमुख अतिथी म्हणून उषा शहारे, उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार संजय नागटिळक आदी उपस्थित होते.आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून या शाळेत विविध साहित्य पुरविण्यात आले. डिजीटल शाळेच्या उद्घाटनासोबत लोकसहभागातून निर्मित बालोद्यानाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते यांनी या विकासात्मक उपक्रमामुळे अतिसंवेदनशिल व आदिवासी भागात राहात असणारे विद्यार्थी नक्की प्रगत होतील, अशी आशा व्यक्त केली. आमदार पुराम म्हणाले, आज विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हेतुने टॅब वितरीत करून एक वेगळा आनंद मिळत आहे.कार्यक्रमाला देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश लदरे, लक्ष्मण आंधळे, एल.यू.खोब्रागडे, पं.स.सदस्य लखनी सलामे, मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के, मोरेश्वर गावडकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी.सी.दिघोरे, केंद्रप्रमुख जि.एम.वैद्य, सामाजिक कार्यकर्ता कुलदीप लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच डॉ.रहांगडाले, संचालन चेतन उईके तर आभार मुख्याध्यापक किशोर गर्जे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सचिव बंसोड व समस्त गावकरी तथा शिक्षकांनी प्रयत्न केले.(जिल्हा प्रतिनिधी)